Breaking : टोकीयो ऑलिम्पिकसाठी कुस्तीपटू विनेश फोगट पात्र

वृत्तसंस्था
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हीचा जागतिक कुस्ती स्पर्धेतून टोकीयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. काल (ता.17) जपानच्या मायुकडून पराभूत झाल्याने तिला ब्राँझपदकाची संधी होती, मात्र तिला रिपिचेजला दोन लढती जिंकणे आवश्यक होते. 

नवी दिल्ली : भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हीचा जागतिक कुस्ती स्पर्धेतून टोकीयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. काल (ता.17) जपानच्या मायुकडून पराभूत झाल्याने तिला ब्राँझपदकाची संधी होती, मात्र तिला रिपिचेजला दोन लढती जिंकणे आवश्यक होते.  2020 मध्ये होणाऱ्या टोकीयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती यंदाची पहिली कुस्तीपटू आहे. 

Image result for vinesh phogat hd images

पहिल्या फोरीत विनेशने स्वीडनच्या मॅटसनला 13-0ने तांत्रिक गुणाधिक्यावर पराभूत केले. मात्र, दुसऱ्या फेरीत मायूकडून तिला 7-0 असा पराभव स्वीकारावा लागला. जपानच्या मायुने अंतिम फेरी गाठल्यने विनेशला रिपेचेजची संधी मिळाली. रिपेचेजमध्ये तिने पहिल्या लढतीत युक्रेनच्या ब्लाहिनयाला 5-0 असे पराभूत केले. 

दुसऱ्या लढतीतने तिने अमेरिकेच्या साराहला 8-2ने पराभूत केले. आता आज होणाऱ्या ब्राँझपदकाच्या लढतीत विनेश पराभूत झाली तरीही नियमांनुसार पहिले सहा कुस्तीपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतात, त्यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या ब्राँझपदकाच्या लढतीत विनेश पराभूत झाली तरी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wrestler Vinesh Phogat qualified for Tokyo Olympics 2020