
Wrestlers Protest : चार महिने गाजलेल्या आंदोलनाला अमित शाहांच्या भेटीनंतर वेगळं वळण? काय झालेलं 'त्या' मध्यरात्री
Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात अनेक महिन्यांपासून सुरू असलेला आंदोलनाला वेगळं वळण मिळाले आहे. या आंदोलनात ऑलिम्पिक पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिक आघाडीवर दिसली. गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह नोकरीवर परतले आहेत. मात्र आंदोलन सुरूच राहणार आहे.
आंदोलक कुस्तीपटूंनी शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या बैठकीच्या दोन दिवसांनंतर सोमवारी साक्षी मलिकने आंदोलनातुन माघार घेतली आणि पुन्हा रेल्वेत नोकरीवर रुजू झाल्याची बातमी समोर आली.
साक्षी मलिकने तिच्या कामावर परतल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. न्यायाच्या लढाईत आपल्यापैकी कोणीही मागे हटले नाही. सत्याग्रहासोबतच मी रेल्वेतील जबाबदारी पार पाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. कृपया कोणतीही चुकीची बातमी पसरवू नका.
सकाळी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की कुस्तीपटूंनी शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, पण सकाळ या भेटीची पुष्टी करत नाही. अमित शाह यांच्या निवासस्थानी ही बैठक सुमारे 2 तास चालल्याचा दावा केला जात आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात चौकशीच्या मागणीसोबतच कुस्तीपटूंनी त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचा आग्रह धरल्याचेही बोलले जात आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, गृहमंत्री अमित शाह आणि कुस्तीपटूंची ही बैठक शनिवारी रात्री 11 वाजता झाली ज्यामध्ये साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया सामील होते. खाप पंचायतींनी केंद्र सरकारला 9 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला असताना अमित शाह यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली आहे.
या सोबतच अमित शाहा यांनी या प्रकरणीची निष्पक्ष चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बैठकीत कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेचा आग्रह धरला आणि लवकरात लवकर कारवाईची मागणी केली.
यानंतर कुस्तीपटूंनी हे प्रकरण जलदगतीने मार्गी लावण्याची मागणी सुरू केल्यावर सुमारे दोन तासांच्या बैठकीत गृहमंत्र्यांनी तिन्ही खेळाडूंना सांगितले की, पोलिसांना त्यांचे काम करण्यासाठी वेळ देऊ नये का?
रविवारी 4 जून रोजी कुस्तीपटू बजरंग पुनिया सोनीपतला पोहोचला. तेथे तो म्हणाला, लवकरच सर्व संघटनांना एकत्र बोलावून मोठी पंचायत होणार आहे. तीन-चार दिवसांत निर्णय होईल.