
WTC Final 2023 : पुन्हा लागलं दुखापतींच ग्रहण; भारताच्या धडाकेबाज फलंदाजाला सरावावेळी झाली दुखापत?
WTC Final 2023 Injury Indian Players : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन 2023 ची फायनल येत्या 7 जूनपासून ओव्हलवर सुरू होत आहे. भारत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तर ऑस्ट्रेलियाचा संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली WTC ची गदा पटकावण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय संघ यापूर्वीच इंग्लंडला रवाना झाला असून त्यांनी रविवारी ओव्हलवर सराव देखील केला. मात्र या सरावावेळीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला.
भारतीय संघातील विकेटकिपर आणि धडाकेबाज फलंदाज इशान किशनला ओव्हलवर झालेल्या सराव सत्रादरम्यान दुखाप झाली. इशानला फलंदाजी करताना ही दुखापत झाली. त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. नेटमध्ये फलंदाजी करताना चेंडू थेट त्याच्या हाताला लागला. त्यानंतर तो वेदनेने कळवळत होता. आता किशन दुखापतग्रस्त होऊन बाहेर होणार असे वाटले होते. मात्र असं झालं नाही. इशान डाव्या हाताला पट्टी बांधून खेळतना दिसला.
इशानला संधी मिळणार का?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 फायनलसाठी भारतीय संघाने केएस भरत आणि इशान किशन या दोन विकेटकिपर्सची निवड केली आहे. दोन्ही खेळाडूं हे जबरदस्त आहेत. दोघांपैकी कोणता खेळाडू प्लेईंग 11 मध्ये खेळणार हा मोठा प्रश्न आहे. भारतीय क्रिकेट वर्तुळातील अनेक दिग्गज खेळाडू हे इशान किशनला प्लेईंग 11 मध्ये खेळवावे असे मत व्यक्त करत आहेत. तर काहींनी भरतला खेळवण्यात यावे असे मत व्यक्त केले. भरतने भारतात ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत विकेटकिपिंग केली होती.