rishab pant
rishab pant bcci twitter

WTC Final : प्रॅक्टिस मॅचमध्ये पंतचा नाबाद शतकी तोरा!

न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट फायनल लढतीपूर्वी पंतच्या भात्यातून फटकेबाजी

न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Fianal) धमाका करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत रिषभ पंतने दिले. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी भारतीय संघाने आपापल्यात प्रॅक्टिस मॅच खेळली. या सामन्यात ऋषभ पंतनेपंत (Rishabh Pant) धावांची बरसात केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कांगारुंची झोप उडवणाऱ्या पंतने आता किवींचा समाचार घेण्यास सज्ज असल्याचे संकेतच प्रॅक्टिस मॅचमधील फटकेबाजीने त्याने दिले.

रिषभ पंतने (Rishabh Pant) 94 चेंडूत नाबाद 121 धावांची खेळी केली. षटकार करुन अर्धशतक पूर्ण करणारा पंत 121 धावांची मोठी खेळी करून शेवटपर्यंत नाबाद राहिला. अर्धशतक झळकावल्यानंतरच तो सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आला होता. दिवसाअखेर प्रक्टिस संपल्यानंतर त्याने यात आणखी 50 +धावा जोडल्या. त्याच्याशिवाय शुभमन गिलने 135 चेंडूचा सामना करताना 85 धावांची खेळ करत प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची दावेदारी मजबूत केली.

rishab pant
WTC Final : टीम इंडियाला भिडण्यापूर्वी टेलरचा 'ट्रेलर'

दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये ईशांत शर्माने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. गेल्या काही दिवसांपासून ईशांतच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळेल, अशी चर्चा सुरु आहे. पण प्रॅक्टिस मॅचमध्ये ईशांतची कामगिरी त्याची जागा पक्की होण्याचे संकेत देणारी आहे. रिषभ पंत मागील काही सामन्यांपासून दमदार फॉर्ममध्ये दिसतोय.

rishab pant
VIDEO : दोन षटकार खाल्यावर पाक गोलंदाजाने रसेलला केले जखमी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयात पंतने मोलाचा वाटा उचलला होता. त्याच्या खेळीच्या जोरावरच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा टीम इंडियाचा मार्ग सुकर केला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान साउथहॅम्प्टनच्या मैदानात रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील फायनल रंगणार आहे. भारतीय संघ पहिला वहिली ट्रॉफी जिंकण्यासाठी उत्सुक असेल. दोन्ही संघ तुल्यबळ असून आयसीसीची पहिली ट्रॉफी कोण पटकवणार ते पाहण्याची क्रिकेट चाहत्यांमधील उत्सुकताही शिगेला पोहचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com