esakal | इंडो-पाक ऑल टाईम ड्रिम इलेव्हन; धोनीच कॅप्टन!
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs pak

इंडो-पाक ऑल टाईम ड्रिम इलेव्हन; धोनीच कॅप्टन!

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण वातावरणामुळे दोन्ही देशातील क्रिकेटला ब्रेक लागलाय. दोन्ही संघात द्विपक्षीय मालिका होत नसली तरी या दोन्ही संघांचा विषय आजही चर्चेचा विषय ठरतो. सध्याच्या घडीला दोन्ही देशातील क्रिकेटसंदर्भात एक हटके गोष्ट चर्चेत आली आहे. पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटर यासिर अराफत (Yasir Arafat) याने भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंचा ऑलटाइम टी-20 इलेव्हन संघ निवडला आहे. (Yasir Arafat Selects All Time T20 XI Of India Pakistan Combined MS Dhoni Captain)

यासिरने यूट्यूब चॅनल 'स्पोर्ट्स यारी' या कार्यक्रमात भारत-पाक संघातील खेळाडूंची ड्रिम इलेव्हन सांगितली. त्याने कॅप्टन म्हणून धोनीला पसंती दिली. सोहेल तन्वीर, उमर गुल आणि जसप्रीत बुमराह या तीन गोलंदाजांना त्याने आपल्या संघात स्थान दिले. इंडिया-पाक ड्रिम इलेव्हन संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी त्याने विराट-रोहितची निवड केलीये. युवराज सिंग आणि उमर अकमल याला त्याने धोनीच्या अगोदार चौथ्या आणि पाचव्या स्थानासाठी निवडले आहे.

हेही वाचा: WTC Final : काय आहे विराट कोहली-शास्त्री गुरुजींची डोकेदुखी?

अराफतने अष्टपैलूच्या रुपात शाहिद आफ्रीदी आणि सईद अजमल यांना संघात स्थान दिले. यावेळी आपल्यी टीमचा कूल कॅप्टन धोनीवर त्याने कौतुकाचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. 'धोनी हा मानसिक आणि शारिरिक दृष्ट्या कणखर व्यक्तीमत्व असून तो विनम्र असल्याचे अराफातने म्हटले आहे.

हेही वाचा: WTC Final : सिराजला प्लेइंग XI मध्ये संधी, दिग्गजाला डच्चू?

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 27 सामने खेळणारा यासिर म्हणाला की, धोनीची कॅप्टन्सी कमालीची होती. खेळाडूंसोबतचे त्याचे नाते अनोखे होते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम तो करायचा. त्याने कधीही कोणत्या खेळाडूवर टीका केल्याचे आठवत नाही, असेही तो म्हणाला.

यासिर अराफातची टी20 प्लेइंग-XI: रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद हाफिज, युवराज सिंग, उमर अकमल, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेट किपर), शाहिद आफ्रिदी, सोहेल तन्वीर, उमर गुल, जसप्रीत बुमराह आणि सईद अजमल.