"कालच लिलाव झाला अन्..."; गल्ली क्रिकेटमध्ये मुलीची तुफान फटकेबाजी, सचिनने शेअर केला Video | Sachin Tendulkar share video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sachin tendulkar share video

"कालच लिलाव झाला अन्..."; गल्ली क्रिकेटमध्ये मुलीची तुफान फटकेबाजी, सचिनने शेअर केला Video

Sachin Tendulkar: क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

एका गावातील गल्ली क्रिकेटमधील हा व्हिडिओ असून त्यामध्ये अल्पवयीन मुलगी क्रिकेट खेळताना दिसत आहे. तर तिने केलेल्या फटकेबाजीने सचिन तेंडुलकरही खूश झाला आहे.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

सचिनने शेअर केलेला व्हिडिओ एका गावातील आहे. गावातील काही मुले क्रिकेट खेळताना यामध्ये दिसत आहेत. तर एक १० ते १२ वर्षाची मुलगी फलंदाजी करताना दिसत आहे.

तिने केलेली फटकेबाजी पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या मुलीने या खेळीमध्ये षटकारांचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान, काल महिलांच्या आयपीएलचा लिलाव झाला. याचा संदर्भ देत सचिनने म्हटलं आहे की, "कालच लिलाव संपला अन् आज सामना सुरू? व्वा.. क्या बात है... तुझ्या फटकेबाजीचा आनंद घेतोय... व्हाट्सअपद्वारे मिळालेला व्हिडिओ." असं कॅप्शन सचिन तेंडुलकरने आपल्या व्हिडिओवर टाकलं आहे.