युक्ता वखारियाचे निर्विवाद वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

पुणे - अभिनव इंग्लिश माध्यम प्रशालेच्या युक्ता वखारिया हिने जलतरण प्रकारात मुलींच्या एकूण १० सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवून निर्विवाद वर्चस्व राखले. तिला केवळ ५० मीटर फ्री-स्टाइल प्रकारात रौप्यपदक मिळाले. अन्य सहभाग घेतलेल्या सर्व प्रकारांत तिने सोनेरी कामगिरी केली.

पुणे - अभिनव इंग्लिश माध्यम प्रशालेच्या युक्ता वखारिया हिने जलतरण प्रकारात मुलींच्या एकूण १० सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवून निर्विवाद वर्चस्व राखले. तिला केवळ ५० मीटर फ्री-स्टाइल प्रकारात रौप्यपदक मिळाले. अन्य सहभाग घेतलेल्या सर्व प्रकारांत तिने सोनेरी कामगिरी केली.

टिळक तलावावर पार पडलेल्या या स्पर्धेत युक्ताने पहिल्या दिवसापासून सुवर्णपदकांचा सपाटा लावला होता. स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी तिने किमान दोन सुवर्णपदके पटकावली आहे. आज जलतरणाच्या अखेरच्या दिवशी तिने १६ वर्षांखालील गटात १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १ मिनिट १६.१८ सेकंद अशी सरस वेळ दिली. त्यापूवी४ तिने ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत ४१.०९ सेकंद अशी वेळ देत जिंकली. 

मुलांच्या विभागात अन्वेश प्रसादे याने देखील वर्चस्व सिद्ध केले. त्याने अखेरच्या दिवशी १२ वर्षांखालील गटात ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत ४५.३४ सेकंदात जिंकली. याच वयोगट आणि स्पर्धा प्रकारात मुलींमध्ये सेंट हेलेनाज प्रशालेच्या स्वरा शिंदे हिने सुवर्णपदक पटकावले. 

अन्य शर्यतीमधून साहिल गनबोटे याने २००मीटर वैयक्तिक मिडले (२ मिनिट २५.५६ सेकंद) आणि ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (३८.७२ सेकंद) अशा दोन शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. या खेरीज कनिष्का शोकिन (२०० मीटर वै. मिडले, २ मिनिट२९.७० सेकंद), सोहम गोसावीने २०० मीटर फ्री-स्टाइल (बिशप्स,कॅम्प, २ मिनिट १३.२१ सेकंद), रिया तोरी (५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक, ४२.२६ सेकंद), सत्यजित कुमठेकर (५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक३३.९५ सेकंद), तन्मय ठाकूर (१०० मीटर बटरफ्लाय,१ मिनिट १२.५० सेकंद), सोहम गोसावी (१०० मीटर बटरफ्लाय १ मिनिट ६.२० सेकंद) यांनी आपापल्या वयोगटातून सुवर्णपदक मिळविले.

Web Title: yukta vakharia swimmer