'जर तू बॉलिंग करशील तर..'; इंग्लंडची डॅनियल चहलला काय म्हणाली पाहा

टीम ई-सकाळ
Wednesday, 12 February 2020

या अगोदर चहलने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ऋषभ पंतसोबतचा एक फोटो शेअर केला होता. तेव्हा डॅनियलने त्यावर खोचक टिप्पणी केली होती.

टीम इंडियातील युवा फिरकीपटू युझवेंद्र चहल सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत असतो. कमेंटही करत असतो. मात्र, इंग्लंड महिला क्रिकेटपटूच्या एका फोटोवर केलेल्या कमेंटमुळे चहल सध्या ट्रोल होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याचं झालं असं की, इंग्लंड क्रिकेट टीममधील तडाखेबाज बॅट्समन असलेल्या डॅनियल वॅटने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो अपलोड केला. त्यावर चहलने कमेंट केली. त्याला खोचक टोला लगावत डॅनियलने चहलच्या दांड्या गुल केल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Great to be back in Melbourne again 

A post shared by Danielle Wyatt (@danniwyatt28) on

- ICC ODI Ranking : बुमराची घसरण तर ‘सर जडेजा’ चमकले!

मेलबर्न ग्राउंडवर प्रॅक्टीसदरम्यानचा एक फोटो डॅनियलने शेअर केला असून 'मेलबर्नमध्ये परतल्यावर चांगलं वाटत आहे,' अशी कॅप्शन या फोटोला दिली आहे. यावर चहलने '६६६६६६' अशी कमेंट केली आहे. याला डॅनियलने दिलेले उत्तरही मजेशीर आहे.

Image may contain: text

- 'नो बॉल' संदर्भात आयसीसीचा मोठा निर्णय; वर्ल्डकपपासून होणार अंमलबजावणी!

'जर तू बॉलिंग करत असशील तर नक्की' अशी कमेंट दिल्याने चहल बुचकळ्यात पडला आहे. डॅनियलने केलेल्या कमेंटला नेटकऱ्यांनी प्रचंड लाइकही ठोकल्या आहेत. यामुळे चहलने स्वत:चं हसू करून घेतलं आहे.   

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Just the two team mates - chilling 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23) on

चहल आणि डॅनियलमधील हे सोशल युद्ध पुन्हा उफाळून आले आहे. या अगोदर चहलने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ऋषभ पंतसोबतचा एक फोटो शेअर केला होता. तेव्हा डॅनियलने त्यावर खोचक टिप्पणी केली होती.

- ऑस्ट्रेलियाचा 'हा' धडाकेबाज फलंदाज होणार टी-20मधून निवृत्त?

सध्या टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. वनडे सीरिजमध्ये मिळालेल्या व्हाईटवॉशच्या धक्क्यातून बाहेर पडत टीम इंडिया आगामी टेस्ट सीरिजच्या तयारीला लागली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Got your back always 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuzvendra Chahal gets hilariously trolled by Danielle Wyatt again on Instagram