esakal | चहल-धनश्रीचा वर्कआउट; नेटकऱ्यांनी दिल्या मजेदार कमेंट्स
sakal

बोलून बातमी शोधा

Yuzvendra Chahal And Dhanashree Verma

चहल-धनश्रीचा वर्कआउट; नेटकऱ्यांनी दिल्या मजेदार कमेंट्स

sakal_logo
By
सुशांत जाधव

युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्नी धनश्री (Dhanashree Verma) सोबत वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये चहल आणि धनश्री वर्कआउट करताना दिसते. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते. काही मजेदार कमेंट्स देखील नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहेत.

एका नेटकऱ्याने पत्नीसोबत वर्कआउट करण्यापेक्षा ग्रेट खलीसोबत वर्कआउट करण्याचा असा सल्ला, युजीला दिलाय. तर दुसऱ्या एका युजर्सने वजन वाढव आणि मग इतकी मेहनत घे, असा टोला चहलला मारला आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री सोशल मीडियावर चांगली सक्रीय असते. धनश्रीच्या डान्सचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियातील लोकप्रिय माध्यम असलेल्या युट्युबवरुन डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते.

हेही वाचा: INDvsSL भारताचा संभाव्य संघ;अय्यर-धवनमध्ये कॅप्टन्सीचा सामना

इंग्लंड दौऱ्यासाठी चहलला भारतीय संघात जागा मिळालेली नाही. मर्यादित सामन्यांच्या आगामी श्रीलंका दौऱ्यावर तो संघात दिसू शकतो. भारतीय संघ जुलैमध्ये श्रीलंकेमध्ये 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसह वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित होणाऱ्या मालिकेत युजवेंद्र चहलला मुख्य भूमिकेत स्थान मिळू शकते.

हेही वाचा: वर्णभेदाच्या प्रकरणात आणखी एक इंग्लिश प्लेयर अडचणीत

युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना दिसला होता. या स्पर्धेत त्याला नावाला साजेसा खेळ करता आलेला नाही. श्रीलंका दौऱ्यावर दमदार कामगिरी करण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. याशिवाय आयपीएलच्या उर्वरित सामन्यात तो कशी कामगिरी करणार याकडेही सर्वांचे लक्ष असेल.