संघर्षपूर्ण विजयासह झ्वेरेवची आगेकूच

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जून 2018

किजची आगेकूच 
अमेरिकेच्या 13व्या मानांकित मॅडिसन किज हिने प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठताना रुमानियाच्या मिहाएला बुझार्नेस्कू हिचे आव्हान 6-1, 6-4 असे संपुष्टात आणले. किज गेल्या वर्षी अमेरिकन स्पर्धेत उपविजेती ठरली होती. 

पॅरिस - जर्मनीच्या दुसऱ्या मानांकित ऍल्केझांडर झ्वेरेवर याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र, या विजयासाठीदेखील त्याला संघर्ष करावा लागला. महिला विभागात मेडिसन कीज हिने आपली आगेकूच कायम राखली. 

झ्वेरेवने कारकिर्दीत प्रथमच एखाद्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र, त्यापूर्वी त्याला सलग तिसऱ्या सामन्यात संघर्ष करावा लागला. झ्वेरेवने आणखी एका पाच सेटच्या झुंजीत रशियाच्या कारेन खाचानोव याचा 4-6, 7-6(7-4), 2-6, 6-3, 6-3 असा पराभव केला. त्याची गाठ आता तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोचलेल्या जर्मनीच्या डॉमिनिक थिमशी पडणार आहे. त्याने जपानच्या केरी निशिकोरीचे आव्हान 6-2, 6-0, 5-7, 6-4 असे संपुष्टात आणले. 

फ्रेंच ओपन स्पर्धेच्या 12व्या प्रयत्नांत झ्वेरेवला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले, तर खाचानोवला सलग दुसऱ्या वर्षी उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. झ्वेरेवने 63 विनर्स शॉट मारले, तर 13 बिनतोड सर्व्हिस केल्या. 

किजची आगेकूच 
अमेरिकेच्या 13व्या मानांकित मॅडिसन किज हिने प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठताना रुमानियाच्या मिहाएला बुझार्नेस्कू हिचे आव्हान 6-1, 6-4 असे संपुष्टात आणले. किज गेल्या वर्षी अमेरिकन स्पर्धेत उपविजेती ठरली होती. 

Web Title: Zvereva ahead with conflicting victories