फिरायला जाण्याचा प्लॅन करताय; दुबई आहे मस्त ठिकाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

  • जगभरातली वेगवेगळी ठिकाणं तरुणाईला खुणावत असतात. त्यातलेच एक दुबई.

जगभरातली वेगवेगळी ठिकाणं तरुणाईला खुणावत असतात. त्यातलेच एक दुबई. विदेशी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नव्या वर्षात दुबईतील पर्यटन आनंददायी ठरणार आहे. कोणती आकर्षणे आहेत, ते जाणून घ्या आणि नंतर प्लॅन करा दुबई पर्यटनाचा...

दुबई जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण. पर्यटन, खरेदी, खाद्यपदार्थांबरोबरच साहसी पर्यटनाचा आनंद येथे अमाप मिळतो. जगातील सर्वांत उंच इमारतीसोबतच वाळवंटातील कॅमल राईड, सर्वात भव्य इनडोअर थीम पार्क, अशी अनेक आकर्षणे तेथे अनुभवता येतील. यंदा दुबई वॉक ऑफ फेम, दुबई क्रीक, सीजर्स पॅलेस, कोका-कोला अरेना ही आणखी काही नवी पर्यटनस्थळे पाहता येतील. नव्या वर्षात दुबईतील पर्यटन आनंददायी ठरणार आहे.

VIDEO! दूर्बिणीशिवाय सुर्यग्रहण कसं पाहता येईल? व्हिडीओ नक्की पहा

सध्या दुबईत म्युझियम ऑफ फ्युचर साकारले जात आहे. एमिरेट्‌स टॉवरसमोरच चंदेरी रंगाची डोळ्याच्या आकाराची इमारत उभी राहत आहे. भविष्याचा वेध घेणारे हे संग्रहालय आहे. प्रदर्शने, थिएटर्स अशी अनेक आकर्षणे येथे असतील, ती आपल्याला भविष्यात घेऊन जातील.

आईन दुबई हा जगातील सर्वात मोठा आकाशपाळणा असणार आहे. २०२० मध्ये तो पर्यटकांसाठी खुला होणार आहे. २५० मीटर उंच असलेल्या या व्हिलमध्ये एका वेळी १४०० जण बसू शकतात. यातील काही कॅप्सुल्समध्ये खाद्यपदार्थही उपलब्ध असतील. मोहंमद बिन रशीद लायब्ररीत अंदाजे साडेचार कोटी ग्रंथसंपदा आहे. या सातमजली ग्रंथालयात एक कोटी ऑडिओ बुक्‍स आणि दोन कोटी ई-बुक्‍स आहेत. याबरोबरच ९२ हजार मीटर परिसरात सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांसाठी राखीव जागा आहेत. 

या टिकटॉक गर्लने लावलं जगाला वेड

ज्ञानवंतांसाठी हा एक खजिनाच ठरणार आहे. दुबईचे आणखी एक आकर्षण ठरणार आहे ते २०० मीटर उंच स्कायवॉक. जणू आकाशात चालण्याचा आनंद याद्वारे अनुभवता येणार आहे. जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफा इमारतीवरून निरीक्षणाचा आनंद देणारी नवी गॅलरी २०२० मध्ये खुली होणार आहे. २४० मीटर उंच गॅलरीतून शहर पाहता येणार आहे. अशा अनेक आकर्षणांनी दुबई पर्यटकांच्या स्वागतासाठी नटली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Planning to go tour; Dubai is a good place