सोबत राहणाऱ्या मुलींच्या मासिक पाळीच्या तारीखा सारख्या असतात? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

एखादी महिला दूसऱ्या महिलेच्या अधिक वेळ संपर्कात असते. त्यांच्या मासिक पाळीची तारीख सारखीच होऊ लागते

 

तुमच्या लक्षात आलंय का, तुमच्या रुममेट किंवा सहकारीची आणि तुमची मासिक पाळीची तारीख साररखीच झालीए. हीच तारीख आधी वेगळी होती.?
बऱ्याच महिला आणि मुलींना ही गोष्ट लक्षात आली असेन. परंतु हे असंच होतं की, या मागे काही लॉजिक आहे ? याविषयी तुमच्या शंका दूर करा...

वापरलेल्या कंडोमने केली, तीने स्वतःची गर्भधारणा

 ही बाब अनेक महिला आणि मुली मान्य करतात की, ज्या त्या ज्यांच्या सोबत जास्त वेळ घालवतात त्यांच्या मासिक पाळीची तारीख कालंतराने सारखीच होते. याला McClintock effect असं म्हणतात.

असं मानलं जातं की, एखादी महिला दूसऱ्या महिलेच्या अधिक वेळ संपर्कात असते. त्यांच्या मासिक पाळीची तारीख सारखीच होऊ लागते. शरीरातून निघणाऱ्या फेरोमोन्समुळे
(शरिरातील रसायन) हे होत असतं असं म्हटलं जातं. परंतु याबाबत कोणताही मेडिकल अहवाल किंवा संशोधनाचा पुरावा अस्तित्वात नाही. परंतु, जास्त वेळ सोबत घालवणाऱ्या बहुतांश
महिला मुलींना हा अनुभव येत असतो. 

 

दबंग थ्रीमुळे हिंदूच्या भावना दुखावल्या, सोशल मीडियावर ट्रेंड

मासिक पाळीच्या तारखा एकाच दिवशी येणाऱ्या बाबीवर काही प्रमाणात संशोधन सुरू झाले आहे. मार्था मॅकक्लिन्टोक या संशोधकाने 135 महाविद्यालयीन तरुणींवर संशोधन केले. या
संशोधनादरम्यान, मुलींना सोबत ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मासिक पाळीच्या तारखा सारख्या झाल्या. 

या संशोधन अभ्यासात फक्त हे पाहिलं गेलं की, त्यांची मासिक पाळी कधी सुरू झाली. यावरून त्यांच्या लक्षात आलं की, या मुलींची मासिक पाळीची तारीख एक झाली. तेव्हा पासून त्याला मॅक्लिन्टॉक इफेक्ट म्हटलं गेलं आहे. 

 

पुजा हेडगे पुन्हा तेलगू चित्रपटाकडे

2017 मध्ये केलेल्या अभ्यासात एक बाब समोर आली की, सोबत राहणाऱ्या 44 टक्के मुलींची मासिक तारिख सारखी झाली होती. यावरून पुन्हा हे लक्षात आलं की, सोबत राहणाऱ्या महिला मुलींची मासिक पाळीची तारीख सारखी होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Are menstrual periods similar to those of accompanying girls?