सोनाली, सायली भार्गवीचा ब्लॅक साडी लूक पाहिलायं...नजर हटणार नाही!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

यंदाही मराठी अभिनेत्रींने काळ्या साडीमधील फोटो पोस्ट करून आपल्या फॅन्सला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, सायली संजीव, भार्गवी चिरमुले प्रार्थना बेहरे या अभिनेत्रींनी काळ्या साडी नेसून फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

मकर संक्रांत हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संक्रातीला महाराष्ट्रात काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. संक्राती दिवशी सुवासिनी काळी साडी नेसून वाण देऊन हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. नवविवाहितेला काळी साडी भेट देण्याची प्रथा आहे. संक्रातीला काळ्या साडीमध्ये कित्येक अभिनेत्री सुंदर फोटोज सोशल मिडीयावर फोटोज पोस्ट करत असतात. त्यांचे सुंदर फोटो पाहून त्यांचे चाहते घायाळ होतात.

प्रत्येक सणानुसार नवा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. या ट्रेंडनुसार सेलेब्रेटीज आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो पोस्ट करत असतात. मराठी तारका सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच महाराष्ट्रातील संस्कृती लोकांनापर्यंत पोहचवतात. मकर संक्रातीला सर्व महिला काळी साडी नेसतात. काळाप्रमाणे ह्या प्रथेत थोडा बदल झाला असून साडीची जागा आता ड्रेसने घेतली आहे पण तेवढ्याच उत्साहाने व जल्लोषाने हा सण साजरा करतात.

Makar Sankranti 2021: मकर संक्रांत साजरी करण्यामागचं जाणून घ्या कारण
 

यंदाही मराठी अभिनेत्रींने काळ्या साडीमधील फोटो पोस्ट करून आपल्या फॅन्सला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, सायली संजीव, भार्गवी चिरमुले प्रार्थना बेहरे या अभिनेत्रींनी काळ्या साडी नेसून फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 
 

सोनाली कुलकर्णीचा नुकताच साखरपूडा झाला आहे. मराठी साज शृंगार करून तिने काळ्या साडीतील फोटो पोस्ट केले आहेत. काठापदराच्या साडीवर नथ आणि मोहनमाळ सोन्याच्या दागिने घालून महाराष्ट्रीयन लूक केला आहे. तिच्या चाहत्यांनी फोटो लाईक करून कंमेंट्समध्ये संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

'काहे दिया परदेस', 'शुभमंगल ऑनलाईन' या मराठी मालिकांमधून प्रक्षेकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री सायली संजीव हिने देखील काळ्या रंगाच्या ड्रेस परिधान करुन फोटो पोस्ट केला आहे. सायलीने सोनेरी रंगाची काठ असलेला काळ्या रंगाचा कॉटन ड्रेस वापरुन हटके लूक केला आहे. 

 

मराठी आणि हिंदी दोन्ही सृष्टीत प्रसिध्द असलेली अभिनेत्री अमृता खानविलकर हिने मरुन रंगाची बॉर्डर असलेली काळ्या रंगाची सिल्क साडी नेसून बोल्ड लूक केला आहे. तिचा हा लूक पाहून तिचे चाहते फिदा झाले आहेत.  

Makar Sankranti 2021: संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची कपडे का घालतात?
 

स्वराज्य जननी जिजामाता या मराठी मालिकेत जिजाऊंच्या भूमिकेत उत्तम अभिनय साकारुन प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. सक्रांतीनिमित्त भार्गवीनेही भन्नाट लूकचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. केसांमध्ये फूल, हातात आरसा आणि सोनेरी-काळ्या रंगाच्या साडी नेसून हटके फोटोशूट केले आहे. 

संक्रातीला का घालतात काळे रंगाचे कपडे?
मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येतो काळा रंग उष्णता शोषून घेत असल्याने काळ्या रंगाचे कपडे मकर संक्रांती दिवशी घातले जातात....सविस्तर वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Actress Sankrati 2021 Special Look in Black saree and Dress