रांगेत उभा राहून तरुण कमावतोय दिवसाला 16 हजार रुपये

Standing in a Queue
Standing in a Queueesakal

रांगेत उभे राहणे अत्यंत कंटाळवाणे काम असते. आपण रांग (Queue) टाळण्यासाठी अनेकवेळा घुसून तिकीट काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र आधीपासूनच रांगेत तिष्ठत असलेल्या लोकांचा रोषही ओढवून घेतो. अनेकवेळा वादाचे प्रसंगही येतात. मात्र जगाच्या पाठीवर कुठेही जा या रांगेपासून (Standing in a Queue) कोणाचाही आणि कुठेही सुटका झालेली नाही. मात्र हीच रांगेत उभारण्याची कंटाळवाणी गोष्ट एका तरुणांने उत्पन्नाच्या साधनात रुपांतरित केली आहे.

Standing in a Queue
बोटीचे सारथ्‍य अन्‌ जंगल वाटेतून प्रवास!

लंडनमधला (London) एक 31 वर्षाचा तरुण तुमच्यासाठी कोणत्याही रांगेत उभा राहतो. फक्त तो रांगेत उभे राहण्यासाठी तासाला 20 युरो म्हणजे 2 हजार 29 रुपये घेतो. ज्या लोकांना रांगेत उभे रहायचे नाही. यासाठी ते पैसेही मोजू शकतात त्यांच्यासाठी हा युवक त्यांचे काम सोपे करुन देत आहे. बकिट (Beckitt) नावाचा हा तरुण सांगतो की तो रांगेत उभे राहून दिवसाला 160 युरो म्हणजे तब्बल 16 हजार रुपये कमावतो.

Standing in a Queue
LLC T20 : विरेंद्र सेहवाग इंडियन महाराजा टीमचा असणार कर्णधार

बकिट सांगतो की त्याच्याकडे उन्हाळ्यात सर्वात जास्त काम असते. कारण याच काळात अनेक कार्यक्रम, स्पर्धा आणि प्रदर्शने असतात. बकिटची या कामातील सर्वात आवडती बाब म्हणजे प्रसिद्ध कार्यक्रमासाठी तिकीटाच्या रांगेत उभे (Standing in a Queue) राहणे ही आहे. तो म्हणाला, 'मी व्ही अँड ए मधील ख्रिस्तियन डाओरच्या प्रदर्शनासाठी आठ तास रांगेत उभा होते. खरं तर रांग तीन तासच होती. मात्र माझ्या वयोवृद्ध ग्राहकाने मला त्यांचे तिकीट घेऊन त्यांची वाट पाहण्यास सांगितले होते.'

बकिटने आपल्या कामात अजून वैविध्यपणा आणला आहे. तो आता पाळीव प्राणी सांभळणे (Pet Sitting), पॅकिंग करणे (Packing), खेपा मारणे (Errands) आणि बागकाम (Gardening) या सुविधाही परवतो आहे. बकिटने याबद्दल सांगितले की, मी तासाला 20 युरोपेक्षा जास्त आकारत नाही. या कामात जास्त कौशल्य आणि कष्टही नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com