
Alia Bhatt Birthday: आलियाला लागले होते 'या' पदार्थाचे डोहाळे, पण स्लीमफीट राहण्यासाठी...
Alia Bhatt Pregnancy Cravings : सध्या आलिया मदरहूड एंजॉय करत असल्याने हा काळ फार खास आहे. सिनेमातील सक्सेस बरोबरच ती आपल्या वैयक्तीक आयुष्यातही फार बिझी आहे. रणबीर कपूर सोबत लग्न आणि मुलगी राहाच्या जन्मानंतरही तिच्या प्रोफेशनल लाइफवर फारसा परिणाम झालेला नाही. तिने कामाला परत सुरुवात केली आहे.
अशात प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होतात की, आलिया असं काय खात होती की, तिच्यात एवढी एनर्जी आहे?
आलियाच्या फीट फिगर आणि ग्लोइंग स्कीनचं रहस्य तिच्या रुटीन डाएटमध्ये आहे. ती आई झाल्यानंतर तिच्या रुटीनमध्ये योगापासून ते हेल्दी डाएटपर्यंत सर्व गोष्टी आहेत. ती कायम फीट आणि स्लीम राहण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करते. शक्यतो घरात शिजवलेलंच अन्न ती खाते. आलियाने तिच्या एका व्हिडीओमध्ये याविषयी सांगितलं होतं. तिच्या तीन डिश फेव्हरेट आहे. ज्यामुळे ती फक्त स्लीम फीट नाही तर हेल्दीपण राहते.
प्रेग्नंसीत या पदार्थाचं क्रेव्हींग व्हायचं
प्रेग्नंसीत वेगवगेळे पदार्थ खाण्याची इच्छा होणे फारच सहाजिक आहे. मग त्यातून आलिया तरी कशी सुटणार. कायम हेल्दी फूड खाणाऱ्या आलियाला प्रेग्नंसीत जंक फूडचे डोहाळे लागले होते. हे पुरवण्यासाठी तिची बहिण शाहिन भट्ट चाउमीन पार्टी द्यायची. तर पिझ्झा खाण्याची इच्छा झाल्यावर शिल्पा शेट्टीने तिला पिझ्झा गिफ्ट केला होता.

Alia Bhatt Birthday
आलियाच्या फीटनेस आणि ग्लोइंग त्वचेचं रहस्य
बीट सलाद
आलियाच्या गुलाबी आणि ग्लोइंग स्कीनचं रहस्य बीट आहे. तिला बीटाचं सलाद फार आवडतं. तिच्या डाएटमध्ये ते नेहमी असतं. प्रोटीन आणि हाय ऑक्सिडंट असणारं बीट खाण्याचे भरपूर फायदे आहेत. हाय बीपी कमी करण्यापासून ते कँसर सेल्सशी लढण्यापर्यंत ते मदत करतं. भरपूर फायबर असल्याने पचन क्रियापण चांगली राहते. जे सहज बनवता येतं.

Alia Bhatt Birthday
झुकिनी
आलियाला व्हरायटी फूड आवडतं. त्यातही ती हेल्दीच डाएट घेते. तिच्या आवडत्या डिशेसमध्ये झुकिनीची भाजी आहे. ही भाजी अँटीएजींग व्हेजिटेबल म्हणून पण ओळखली जाते. यामुळे त्वचेवर लवकर सुरकूत्या पडत नाहीत. याशिवाय झुकिनीमध्ये फोलेट, व्हिटॅमिन बी, रायबोफ्लेविन सारखे खास पोषक तत्व आहेत. ज्यामुळे हुशार होतो आणि हार्मोंसपण कंट्रोल राहतं.

Alia Bhatt Birthday
दही भात
आलियाला स्लीमफीट राहण्यासाठी दहीभात खायला आवडतो. विशेषतः डिनरमध्ये. वेटलॉससाठी दहीभात खातात. दह्यातले प्रोटीन, कॅल्शियम, अँटीबायोटिक्स सोबत प्रोबायोटिक आतडे सुदृढ बनवतात.