Black Diamond Apple: बाबो! काळ्या रंगाचंही असतं सफरचंद, एकाची किंमत ऐकून व्हाल थक्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple

Black Diamond Apple: बाबो! काळ्या रंगाचंही असतं सफरचंद, एकाची किंमत ऐकून व्हाल थक्क

जेव्हा फळांचा विचार केला जातो तेव्हा बहुतेक वेळा सफरचंदांना सर्वात फायदेशीर फळांचा दर्जा दिला जातो. निरोगी आयुष्यासाठी, आपल्याला दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. बऱ्याच मुलांना सफरचंद खायला आवडत नाहीत, म्हणून त्यांची आई त्यांच्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटी आणि रंगांची सफरचंद आणतात.

तुम्ही सफरचंदाचे किती रंग पाहिले आहेत? सामान्यत: आपल्याला बाजारात वेगवेगळ्या ऋतूंमध्ये गडद लाल, हलका लाल, हलका पिवळा, हिरवा, हिरवा आणि लाल मिश्रण, पिवळा आणि लाल मिश्रण अशा अनेक रंगांची सफरचंद पाहायला मिळतात. या सर्वांशिवाय काळ्या रंगाचे सफरचंदही बाजारात येतात. तुम्हाला या सफरचंदाबद्दल माहिती आहे का? नसेल तर जाणून घेऊया त्याबद्दल.

काळ्या सफरचंद बद्दल

जगात सफरचंदांच्या 100 हून अधिक जाती आढळतात, त्यापैकी एक म्हणजे 'ब्लॅक डायमंड अँपल'. सफरचंदाची ही एक दुर्मिळ जात आहे जी सर्वत्र सहज उपलब्ध नसते आणि ते कोठेही पिकवता येत नाही. हे काळ्या रंगाचे सफरचंद जांभळ्या रंगाचे असून ते तिबेटच्या टेकड्यांवर उगवले जाते.

येथील रहिवासी या फळाला 'हुआ निऊ' या नावाने ओळखतात. समुद्रसपाटीपासून उंचीवर पर्वतांमध्ये याची लागवड केली जाते. असे म्हटले जाते की ब्लॅक डायमंड अँपलचा काळा रंग दिवसा या फळांवर पडणाऱ्या अतिनील किरणांमुळे असतो, ज्यामुळे त्यांचा रंग गडद जांभळा होतो.

ब्लॅक डायमंड अँपल

या काळ्या रंगाच्या सफरचंदाची लागवड फार जुनी नाही, त्याची लागवड 2015 साली सुरू झाली. बीजिंग, ग्वांगझो, शांघाय आणि शेन्झेनच्या सुपरमार्केटमध्ये या काळ्या सफरचंदांचा वापर सर्वाधिक आहे. ब्लॅक डायमंड अँपलची सरासरी किंमत 50 युआन म्हणजेच 500 रुपये आहे.

ब्लॅक डायमंड अँपल 'हुआ निउ' ही सफरचंदाची दुर्मिळ प्रजाती असून हे सफरचंद 'चायनीज रेड डेलीशिअस' म्हणूनही ओळखले जाते. या फळाच्या दुर्मिळतेचे एक कारण म्हणजे शेतकरी या फळाची लागवड करण्यास नाखूष आहेत, कारण हे सफरचंद विकसित करण्यात अनेक अडचणी येण्याव्यतिरिक्त यास सुमारे सात-आठ वर्षे लागतात आणि केवळ दोन महिन्यांसाठी उपलब्ध आहे.

टॅग्स :lifestyleapple