सेलिब्रिटी वीकएण्ड : स्वतःसाठी वेळ देते

Gauri-Nalawade
Gauri-Nalawade

वीकएण्ड म्हणजे स्वतःला स्वतःसाठी मिळालेला निवांत वेळ. चित्रीकरणाच्या वेळा ठरावीक नसल्यामुळे शनिवार किंवा रविवार याच दिवशी मला सुट्टी मिळते असे नाही. पण, आठवड्यातून एकदा रिकामा वेळ मिळाल्यावर मी माझ्या बेलापूर येथील घरी जाणे पसंत करते. मी मुंबईमध्ये एकटीच राहते. बेलापूरला माझे संपूर्ण कुटुंब आहे. त्यामुळे मी वीकएण्ड त्यांच्याबरोबर साजरा करते. माझी वीकएण्डची संकल्पना थोडी हटके आहे. मला मिळालेल्या वेळात मी मुंबईबाहेर जाणे फारसे पसंत करत नाही.

मी कधीतरी क्वचितच जाते. मी नेहमीच्या कामात एवढी थकते, की घरीच राहून आराम किंवा आपल्या आवडी-निवडी जोपासायला मला आवडतात. माझा एखादा वीकएण्ड घरातील साफ-सफाई करण्यात जातो, तर एखाद्या वीकएण्डला वाचन करते. वेळ मिळाल्यावर मेडिटेशनही करते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, एखादा सिनेमा किंवा नाटक पाहायचे राहून गेले असल्यास मी तेही पाहते. कारण इतर दिवशी नाटक किंवा सिनेमा पाहायला तेवढा वेळ मिळत नाही. मला माझ्या आठवणीतला एक वीकएण्ड सांगावासा वाटतो. मी एका वीकएण्डला माझ्या एका दादाच्या घरी दापोलीला गेले होते. मी तिथल्या निसर्गाच्या प्रेमात पडले. खरे तर कोकण मला खूप आवडतो. आम्ही जेव्हा दापोलीला गेलो तेव्हा संपूर्ण कुटुंबीयांनी मिळून खूप धमाल मस्ती केली होती. हा वीकएण्ड मला रिफ्रेश करणारा होता.
(शब्दांकन - काजल डांगे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com