लाइफस्टाइल कोच : अशी हवी जीवनशैली

Lifestyle
Lifestyle

कोरोनाच्या महासाथीने आपल्या सगळ्यांच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम घडवून आणला असल्याने आपल्याला नव्याने विचार करणे आणि नवे बदल आत्मसात करणे अपरिहार्य आहे. आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम झाल्याने आरोग्यात गुंतवणूक करण्याची वेळ आली आहे. महासाथीने आपले डोळे उघडले आहेत, ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ या उक्तीला नवे आयाम दिले आहेत आणि चांगले आरोग्य किती महत्त्वाचे असल्याचे लक्षात आणून दिले आहे. ‘कोविड-१९’शी लढण्यासाठी किंवा खरे तर कोणत्याही आरोग्यविषयक समस्येशी लढण्यासाठी कमाल प्रतिकारशक्ती असणे महत्त्वाचे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपली प्रतिकारशक्ती बऱ्याच अंशी आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असते. त्यामुळे ‘न्यू नॉर्मल’ जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे. दृष्टिकोनातला बदल (ॲटिट्यूड चेंज), स्वतःची काळजी (सेल्फ-केअर) आणि अन्नसेवनाची योग्य पद्धत (माइंडफुल इटिंग) हे तीन मंत्र आपण गेल्या लेखात पाहिले. आता इतर तीन मंत्र कोणते आहेत ते बघू या.

1) व्यायाम आणि ध्यानधारणा
शरीर आणि मनाचे आरोग्यदायी संतुलन राखण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती उत्तम होण्यासाठी रोज किमान तीस ते चाळीस मिनिटे व्यायाम करण्याची आणि त्याचबरोबर ध्यानधारणा आणि प्राणायामही करण्याची सवय लावून घ्या. त्यामुळे फक्त शारीरिक ताकद वाढण्याबरोबरच संतुलनही योग्य राहते आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या ताकदवान आणि आनंदी राहता. व्यायाम आपल्याला शारीरिकदृष्ट्या फिट ठेवतो, शरीराच्या सगळ्या पेशींपर्यंत रक्ताचा चांगला पुरवठा होतो आणि आवश्यक ती पोषकद्रव्येही पुरवली जातात. व्यायामाने हृदय, मेंदू, तसेच हाडे आणि सांधे यांचेही आरोग्य सुधारते. 

2) झोप चांगली घेण्याकडे लक्ष द्या
प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी चांगली झोप अतिशय महत्त्वाची असते. झोप चांगली झाल्याने नैराश्य कमी होते, वजन कमी होण्यास मदत होते, हृदय आणि मेंदूचे आरोग्य सुधारते, स्नायू दुरुस्त होण्यात सुधारणा होते आणि ॲथलेटिक परफॉर्मन्स वाढतो. रोज किमान आठ तासांची झोप घेण्याची सवय लावून घेतली, तर तुम्ही उठाल तेव्हा तुम्हाला आरोग्यदायी, आनंदी आणि सकारात्मक वाटेल!

3) ताणाला नाही म्हणा
ताण हे अनेक मानसिक आणि शारीरिक व्याधींचे मूळ कारण असते. त्यामुळे ताण काढून टाकणे ही जीवनशैलीविषयक व्यवस्थापन करण्यातले महत्त्वाचे पाऊल आहे. वरील सगळ्या कानमंत्रांचे तुम्ही योग्यरीत्या पालन केले, तर शरीरचक्र नियमित होईल, आरोग्य सुधारेल आणि त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com