फॅशन + : बोहेमियन स्टाइलची अनोखी अदा

bohemian-style
bohemian-style

बोहेमियन स्टाइल ही फॅशन करण्यासाठी कोणत्या एका सिझनची गरज नाही. या स्टाइलविषयी तुम्ही आजपर्यंत बरेच ऐकले असेल. पण, ही फॅशन नक्की कशी सुरु झाली, ती नक्की कशा पद्धतीने करायची याविषयी  टिप्स देणार आहोत.

इतिहास  
बोहेमियन शैली हिप्पी फॅशनशी संबंधित असलेली एक फॅशन आहे, ज्यामध्ये नैसर्गिक फॅब्रिक्स, रेट्रो नमुने, तटस्थ आणि उबदार शेड्स, सत्तरच्या दशकातील शैलीमधील अॅक्सेंट आणि स्टेटमेंट अॅक्सेरीज आणि फ्लेअरचा समावेश असतो. बोहो फॅशनची सुरुवात १९व्या शतकात काउंटरकल्चर म्हणून झाली. आज विविध प्रकारचे बोहो कपडे या शैलीला ट्रेंड म्हणून पाहिले जाते. सैल कपडे, प्रासंगिक वस्तू आणि एकंदरीत कलात्मक, सर्जनशील मिसमॅचसह आरामशीर फॅशन, अशी बोहो स्टाइलची ओळख आहे.

1) बोहोमन स्टाईलमध्ये विविध रंगांचे आणि पॅटर्नचे टॉप्स, जॅकेट, ड्रेस पाहायला मिळतात. भरपूर रंग असणारे, थोडे भडक, फ्लोरल, एम्ब्रॉयडरी असणारे टॉप घाला.

2) टॉप्सऐवजी तुम्ही ड्रेस घालत असाल, तर त्यामध्येही अशीच डिझाइन असणे आवश्यक आहे. बोहो स्टाइलच्या ड्रेसमध्ये सहसा फ्लोरल, पॅर्टन, पिंट्स, नक्षीकाम, फ्लेअर, मोठे हात हे पाहायला मिळते. नेहमीच्या ड्रेसपेक्षा त्यांना घेर असतो. यामध्ये असणारे मॅक्सी ड्रेस उठून दिसतात.

3) तुम्ही टॉप आणि बॉटम्स प्लेन घालणे पसंत करत असाल, तरीही तुम्ही बोहो स्टाइल करु शकता. पायापर्यंत लांब असणारे आणि सैलसर असे हे जॅकेट्स असतात. त्यावर फ्लोरल, विविध रंग किंवा पॅर्टन असल्यास उत्तम. हे तुम्ही एखाद्या प्लेन टॉप आणि पॅंटवर कॅरी करु शकता.

4) बॉट्म्समध्येही बोहो स्टाइलचे अनेक पॅर्टन आहेत. फ्लेअरर्ड जिन्स, बेलबॉटम जिन्स, बोहो प्रिंट मॅक्सी स्कर्ट, रिप्ड डेनिम शॉर्ट्स, हेरम पॅन्ट, प्रिंटेड प्लाझो हे सर्व तुम्ही बोहो स्टाइल करण्यासाठी घालू शकता.

5) बोहो स्टाइलमधील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे स्टेटमेंट ॲक्सेसरीज आणि ज्वेलरी. सिल्व्हर ज्वेलरी या फॅशनसाठी योग्य पर्याय आहे. बोहो स्टाइल करताना मोठे गळ्यातले, मोठे कानातले नोसरिंग, अंगठी, ब्रेसलेट हे नक्की घाला. या ॲक्सेसरीजशिवाय बोहो लुक अपूर्ण आहे. पायामध्ये ॲकलेट घाला.

6) बोहो लुकसाठी तुम्हाला हिल्स घालायची गरज नाही. फ्लॅट्स, ग्लॅडीएटर सॅंड किंवा बोहो फॅशनची सुरुवात पॉमपॉम चप्पल चांगला पर्याय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com