ग्रुमिंग + : आकर्षक हेअर बन

hair-bun
hair-bun

हेअरकटचे असंख्य प्रकार आहेत आणि ट्रेंडनुसार सारखे काहीतरी नवीन येतच असते. मात्र उन्हाळ्यात कोणत्याही हेअर टाइपला सुट होणारी स्टाइल म्हणजे ‘हेअर बन’. सेलिब्रिटींपासून अगदी कॉलेजच्या मुलींपर्यंत कोणावरही हेअर बन सुट होतो. कोणत्याही लुकसाठी हेअर बन करता येऊ शकतो. उन्हाळ्यासाठीदेखील ही अगदी आरामदायी आणि प्रत्येक लुकला सुट होणारी अशी हेअरस्टाइल आहे. हेअर बनचे अनेक प्रकार आहेत, पण काही बेसिक टीप्सने रोजचा लुक चांगला करता येऊ शकतो.

मेसी हेअर बन -
Messy या इंग्रजी शब्दाचा अर्थ गबाळा, अव्यवस्थित असा होतो. असाच काहीसा हा बन असतो. मराठीत बनला आपण सहसा अंबाडा असेही म्हणतो. आता तुम्ही म्हणाल गबाळा, अव्यवस्थित अशी ही हेअरस्टाइल कशी? या प्रकारामध्ये कोणत्याही कंगव्याशिवाय तुम्हाला संपूर्ण केस रबरमध्ये अंबाड्यामध्ये बांधायचे आहेत. हा बन डोक्यावर उंच असा बांधायचा नसून, थोडासा सैलसर आणि मानेवर बांधायचा आहे. कानाच्या बाजूचे काही केस, बटाबाहेर ठेवा. यासाठी तुम्ही पोनीटेलप्रमाणे संपूर्ण केस मागे घेऊ शकता किंवा केसाचा मध्यभागी भांग पाडू शकता. ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये किंवा प्रवासामध्ये हा बन आरामदायी आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दि हाफ अप बन -
नावाप्रमाणेच याप्रकारात बन हा उंच डोक्यावर असला तरी तो अर्धा असतो. दी हाफ अप बनला ‘फिमेल मॅन बन’ असेही म्हणतात. अनेक पुरुषमंडळी काहीसे केस वाढवतात. मात्र मुलींप्रमाणे संपूर्ण केस न बांधता अर्धवट बन ते डोक्यावर बांधतात. त्याचप्रमाणे मुलींनो तुम्हाला अर्धवट पोनीटेलचा बन उंच डोक्यावर बांधून बाकीचे केस मोकळे सोडायचे आहेत. या बनमुळे तुम्हाला आराम आणि फॅशन दोन्ही करता येईल. पारंपारिक, वेस्टन, ऑफिस लूक, जिम लुक अगदी सर्व आउटफिटवर तुम्ही ही हेअरस्टाइल करु शकता.

स्लिक टॉपनॉट -
अनेक सेलिब्रिटींना एअरपोर्टवर लुकमध्ये किंवा चित्रपटांमधूनही तुम्ही स्लिक टॉपनॉट केलेला पाहिला असेल. ही हेअरस्टाइल तुम्हाला नक्कीच सेलिब्रिटी लुक देईल. त्यासाठी जास्त मेहनतदेखील लागत नाही. संपूर्ण केस चांगले सोडवून घेऊन त्याला काहीसे सिरम लावा. संपूर्ण केसांना पुढे घेऊन उंच डोक्यावर पोनिटेलच्या स्वरुपात बांधा. संपूर्ण पोनिटेल न बांधता काहीसा फुगेरी भाग राहू द्यावा. राहिलेल्या केसांना अर्धवट पोनिटेलच्या भोवती घट्ट गोलाकार फिरवून घ्यावे. राहिलेल्या केसांना बॉबीपिन किंवा हेअरपिन लावा. डोक्यावरील केस हे घट्ट आणि संपूर्ण बनमधील येतील याची काळजी घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com