फॅशन + : किमोनो जॅकेटचा जपानी लुक

Kimono-Jacket
Kimono-Jacket

जपानी स्त्रियांच्या पारंपारिक पोशाखाला ‘किमोनो’ असे म्हणतात. अनेक पिढ्यांसाठी जपानी शैलीची व्याख्या एका कपड्याने केली आहे, ते म्हणजे किमोनो. ऐतिहासिकदृष्ट्या लक्षणीय, सौंदर्यात्मक दृष्टीकोनातून आकर्षक किमोनो जपानी संस्कृती आणि डिझाइनचे उत्कृष्ट मिश्रण आहे. कि म्हणजे ‘पोशाख’ आणि मोनो म्हणजे ‘गोष्ट’ असा किमीनो शब्दाचा अर्थ आहे. किमोनो हे पारंपारिक जपानी वस्त्र आहे. ते सामान्यत: ४ सिंगल तुकड्यांमधून ‘टी’ आकारात हाताने शिवलेले असतात आणि ऑबी किंवा बेल्टसह बांधलेले असतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

किमोनोच्या जॅकेटची फॅशन भारतामध्ये आली आहे. उन्हाळ्याच्या सिझनमधील फॅशनसाठी किमोनो जॅकेट हा एक उत्तम पर्याय आहे. बघा तरी या अनोख्या जॅकेटची फॅशनची कशी करायची!

  • किमोनो जॅकेट हे जपानी किमोनो पोशाखाप्रमाणे असले तरी संपूर्णपणे उघडे असते.
  • त्यावर असणारे प्रिंटही फ्लोरल, पॅटर्न किंवा काही डिझाईन असणारे असते.
  • इतर जॅकेट्स आणि किमोनोमधील सर्वांत मोठा फरक म्हणजे हे अत्यंत सैलसर आणि मोकळे-ढाकळे असतात. हातांच्या बाहूंपासून ते सैल असतात. 
  • बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे किमोनो जॅकेट मिळतात. त्यामध्ये सहसा कमरेपर्यंत असे शॉर्ट आणि गुडघ्यापर्यंत असणारे लॉंग असे दोन प्रकार आढळून येतात.
  • डेनिम श़ॉर्टस्, कॅमि टॉप आणि त्यासोबत हे किमोनो जॅकेट घाला. अतिशय ट्रेंडी आणि युनिक असा लुक देईल.
  • जिन्स, कोणताही प्लेन टॉप आणि त्यावर हे जॅकेट कॅरी करा. रोजच्या लुकसाठी हे जॅकेट चांगला पर्याय आहे.
  • जॅकेटला साजेशा कोणत्याही प्लेन वन पिसवरही हे जॅकेट घालू शकता.
  • अनेकदा स्लिवलेस टॉप घालता येत नाहीत. क्रॉप, टॅंक टॉप घालायचा असला, तरी हवी तशी फॅशन करता येत नाही. नेहमीचे जॅकेट हे घट्ट असू शकतात. शिवाय उन्हाळ्यात फॅशनसोबतच कम्फर्टही तितकाच महत्त्वाचा असतो. मग, त्यासाठी किमोनो जॅकेट अगदी उत्तम पर्याय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com