फॅशन + : पावसाळ्यातील पॅरलल पॅन्ट

Parallel-Pant
Parallel-Pant

पावसाळ्यामध्ये फॅशन करण्यापासून कपड्यांना व्यवस्थित सांभाळण्यापर्यंत कसरत असते. मॉन्सूनच्या महिन्यांमध्ये कपडे लवकर वाळत नाहीत. बाहेर वाळू घातल्यास खराब होण्याची चिंता सतावते. तरीही फॅशन करण्याची आवड असतेच. अशा वेळी रोजच्या काही फॅशनमध्ये बदल करून या सर्व समस्या दूर होऊ शकतील. रोजच्या वापरामधला एक घटक म्हणजे जीन्स! पण, पावसाळ्यात जाडजूड जीन्स घालणे कठीण होते. मग, याच जीन्सला ‘पॅरलल पॅन्ट’चा पर्याय आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पॅरलल पॅन्ट म्हणजे काय?
खरंतर ‘पॅरलल पॅन्ट’ या नावावरून पॅटर्नची कल्पना येते. कमरेला घट्ट आणि पायघोळ पॅटर्नला पॅरलल पॅन्ट किंवा पॅरलल ट्राउझर म्हणतात. संपूर्ण पायाला जीन्सप्रमाणे घट्ट न बसता ही पॅन्ट सैलसर असते. फॅशनमधला हा पॅटर्न काहीसा जुना असला, तरी मात्र पावसाळ्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे. 

  • या पॅन्टचे कापड सळसळीत असल्याने लवकर सुकते. 
  • पॅन्ट सैलसर असल्याने तुम्हाला अवघडल्यासारखे वाटणार नाही.
  • पावसाळ्यात भिजल्यामुळे बराच त्रास सहन करावा लागतो. या पॅन्ट घट्ट नसतात त्यामुळे आराम मिळतो. 
  • यामध्ये पायापर्यंत आणि गुडघ्यापर्यंत शॉर्ट अशा दोन प्रकारच्या पॅन्ट मिळतात. दोन्ही प्रकार मॉन्सूनसाठी अगदी योग्य पर्याय आहे.
  • पावसाळ्यात घट्ट आणि लवकर न वाळणाऱ्या जीन्सला पर्याय म्हणून पॅरलल पॅन्ट वापरा.
  • विविध रंग, पॅटर्न, डिझाइन मिळतात. पण, पावसाळ्यासाठी खास मातेरी आणि गडद रंग निवडावे. चिखलात खराब झाल्यास दिसून येत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com