पाणी प्रदूषण रोखण्यासाठी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water pollution

वैयक्तिक पाण्याचा वापरही अत्यंत काटकसरीने केला पाहिजे

पाणी प्रदूषण रोखण्यासाठी...

अशोक तातुगडे

पाण्याच्या प्रदूषणाचे परिणाम अत्यंत गंभीर आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात जलप्रदूषणामुळे दरवर्षी सरासरी चार लाख लोकांचा मृत्यू होतो. हे थांबवायला हवे. त्यासाठी हे करायला हवे

  • कारखान्यातून प्रक्रिया न केलेले अशुद्ध पाणी बाहेर सोडणे बंद केले पाहिजे. हा सर्वात मोठा प्रदूषक आहे.

  • मोठ्या शहरातून सांडपाण्याचे शुद्धीकरण केल्याशिवाय ते इतरत्र न सोडणे. त्याचा पुनर्वापर करणे.

  • सार्वजनिक पाण्याचे स्रोत, जसे की नदी, तलाव, कालवे, विहिरी कुठल्याही तऱ्हेने अशुद्ध न करणे.

  • अनिर्बंध आणि अनियोजित शहरीकरण थांबवणे.

  • विंधन विहिरीतूनही, जरी त्या खासगी मालकीच्या असल्या, तरी त्यातून पाण्याचा अनिर्बंध उपसा करणे थांबवले पाहिजे.

  • शेतीत वापरलेल्या कीटकनाशकांमुळे पाणी दूषित होते. सेंद्रिय कीटकनाशके जास्तीत जास्त वापरली पाहिजेत.

  • वैयक्तिक पाण्याचा वापरही अत्यंत काटकसरीने केला पाहिजे.

  • हे सर्व व अन्य उपाय केल्याशिवाय पाण्याचे प्रदूषण व संभाव्य दुर्भिक्ष थांबू शकणार नाही. अन्यथा, विचारवंतांनी इशारा दिल्याप्रमाणे पुढची महायुद्धे पिण्याच्या पाण्यासाठीच होतील.

टॅग्स :waterpollution