Marriage Tips : लग्नाआधी जोडीदाराला कसे जाणून घ्याल? विचारा हे पाच प्रश्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नाआधी जोडीदाराला कसे जाणून घ्याल? विचारा हे पाच प्रश्न
Marriage Tips : लग्नाआधी जोडीदाराला कसे जाणून घ्याल? विचारा हे पाच प्रश्न

लग्नाआधी जोडीदाराला कसे जाणून घ्याल? विचारा हे पाच प्रश्न

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली मोठी घटना असते. एका निर्णयामुळे दोन्ही व्यक्तींचे आयुष्य बदलते. त्यामुळे जोडीदार आपल्या अपेक्षेप्रमाणे आहे का हे माहिती असणे आवश्यक आहे. एकदा का तुम्ही सगळ्या बेसिक गोष्टी पाहून जोडीदाराची निवड करायला सुरूवात केलीत की कोणीनाकोणी आवडतोच. अशावेळी त्याच्याबरोबर लग्नाचा निर्णय घेण्याआधी काही गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी काही गोष्टी स्पष्टपणे एकमेकांना विचारणे गरचेचे आहे.

हेही वाचा: जादू की झप्पी... एक मिठी देईल तुम्हाला या सगळ्यापासून मुक्ती

मनाचा विचार

काहीजण घरचे लग्नासाठी खूप पाठी लागतात म्हणून लग्न करायला हो म्हणतात. ती मुलगी किंवा मुलगा आपल्याला आवडलेला आहे कि नाही याचा विचार ते करत नाही. अशा व्यक्ती तुमच्या बोलण्यात फारश्या इंटरेस्ट घेत नाहीत. त्यामुळे ती व्यक्ती मनापासून लग्नाला तयार झाली आहे का ते विचारणे गरजेचे ठरते. इच्छेनुसार आणि आवडीनुसार लग्न करण्याची तयारी नसेल तर दोघांच्या आयुष्य़ावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून याची स्पष्ट कल्पना असावी.

आवडी- निवडी

समोरच्या व्यक्तीच्या आवडी-निवडी काय आहेत, हे समजून घ्या. त्याप्रमाणे तुम्ही अशा व्यक्तीबरोबर एडजस्ट करू शकता का हे तपासा. त्या आवडींबरोबर जोडीदाराच्या स्वभावाची कल्पना येईल.

करिअर प्लॅन

समोरच्या व्यक्तीचा करिअरबाबत विचार काय आहे, ते समजून घ्या. दोघांची नोकरी, पगार किती? भविष्यातील करिअरबाबत योजना याबाबत चर्चा करा.लग्नानंतर दुसरीकडे स्थायिक होण्याचा विचार आहे का तेही माहिती करून घ्या. तुमच्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय का महत्वाचा आहे हे एकमेकांना पटवून द्या.

अपेक्षांचा विचार

दोघांना एकमेकांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, त्याबद्दल स्पष्ट बोला. एकमेकांबद्दल सकारात्मक असाल तर तसे बोलण्यातून जाणवते का, हेही तपासून पाहा. काही अपेक्षांची स्पष्ट कल्पना द्या. असे केल्यास ज्या गोष्टींमुळे अडचणी येत आहेत त्या प्रकर्षाने समोर येतील. तसेच त्या सोडवून पुढे जायचे की तिथेच थांबायचे हे कळेल.

कुटूंब नियोजन

मुलं होण्याबाबत दोघांचं मत काय आहे, किती वर्षांनी मुल असावं असं वाटतं. या निर्णयाविषयी मानसिक,शारिरिक, आर्थिक सक्षम आहात का याबद्दलही मनमोकळेपणाने चर्चा करा. त्यावरून तुम्हाला योग्य निर्णय घेणे सोपे होईल.

हेही वाचा: मांसाहारी पुरुषांसाठी धक्कादायक बातमी! पर्यावरणास ठरताहेत धोकादायक

loading image
go to top