Astro tips : रस्त्यावर पैसे सापडले तर काय करावं? काय सांगतं शास्त्र! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Tips

Astro tips : रस्त्यावर पैसे सापडले तर काय करावं? काय सांगतं शास्त्र!

रस्त्यावर जाता एखादा एक रूपयाचा कॉईन सापडला. तर, आपण त्याच्याकडे एखादे घबाड सापडल्यासारखं बघत असतो. खिशात हजाराच्या नोटा असल्या तरी सापडलेला बंदा रूपयाही आपल्याला आनंद देऊन जातो. पण, ते पैसे तुम्हाला सापडणे यामागे काही संकेतही आहेत.

रस्त्यावर पडलेली ही नाणी आणि नोटा अनेक शुभ आणि अशुभ संकेतही देतात. या नोटा किंवा नाणी उचलायची की नाही, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे अनेक वेळा लोक हे पैसे उचलतात आणि मग गरजूंना देतात किंवा मंदिरात दान करतात. तूम्हाला असे पैसे सापडले तर काय करायचं ते पाहुयात.

पैसे सापडण्याचे शुभ संकेत

- रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे म्हणजे धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे,असे मानले जाते. तसेच,  लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होते.

- रस्त्यावर नोट सापडणे म्हणजे तुमच्या काही मोठ्या अडचणी दूर जातात असे संकेत आहेत. तसेच देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात मोठा आनंदाचा क्षण येणार असल्याचेही हे लक्षण आहे.

- जर तुम्हाला कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल. त्याचवेळी तुम्हाला रस्त्यावर एक नाणे पडलेले दिसले तर याचा अर्थ असा आह की, तुमचे प्लॅनिंग पूर्ण होणार आहेत.

- तूम्ही एखादे काम संपवून परत येत असाल. तर, लवकरच मोठा नफा मिळण्याचे संकेत आहेत. वाटेत पैशांनी भरलेली पर्स दिसली तर ते मोठ्या लाभाचे लक्षण आहे.

पैसे सापडल्यानंतर काय करावं

- जर तूम्हाला एखादा बंदा रूपया सापडला. तर, तो उचलून कपाळाला लावा. तसेच तूमच्या पाकिटात कींवा खिशात ठेवा.

- घरी गेल्यानंतर ते पैसे आणि धणे एका छोट्या पिशवीत घाला. ती पिशवी तिजोरीत ठेवा आणि जेव्हा तूम्ही एखादे मोठे आर्थिक उलाढाल करण्यासाठी जात असाल तेव्हा ती पिशवी सोबत घेऊन जा. यामूळे तूमचे काम नक्की होईल

- जर तूम्हाला १० हजाराची मोठी रक्कम सापडली असेल. तर त्याची तूमच्या देवघरात पूजा करा. आणि ती तूमच्या कपाटात ठेवा. त्याऐवजी तूमच्याकडील नव्या कोऱ्या नोटा असलेली १० हजाराची रक्कम संबंधित पैशांच्या मालकाला परत द्या.