Lifestyle- Early Aging नको असेल तर या सवयी आधी सोडा, रोजच्या सवयी तुम्हाला पडतील महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीर्घकाळ रहा तरुण

Early Aging नको असेल तर या सवयी आधी सोडा, रोजच्या सवयी तुम्हाला पडतील महागात

ओगेल्या काही वर्षभरामध्ये तरुणांमध्ये Youth देखील आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. एकेकाळी केवळ उतार वयात होणाऱ्या हृदयाच्या Heart, कोलेस्ट्रॉल, मधुमेह, साधेदुखी किंवा इतर अनेक गंभीर समस्यांनी तरुण वयातच अनेकांना ग्रासलंय. Avoid Early Aging change your daily habits

अर्थात बदलत्या जीवनशैलीमुळे Life Style तरुणांमध्ये अनेक आजार आणि गंभीर समस्या निर्माण होवू लागल्या आहेत. अलिकडचे तरुण जगत असलेल्या चुकीच्या जीवनशैलीचा Life Style त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

अनेक चुकीच्या सवयींमुळे उतारवयात Old Age होणारे आजार कमी वयातच होताना दिसचं आहेत. यासाठीच काही सवयी Habits बदलंणं अत्यंत गरजेच आहे. अन्यथा तारुण्यातच म्हातारपणाच्या वेदना सोसाव्या लागू शकताता.

तरुणांमध्ये एनर्जी Energy टिकून रहावी. आरोग्याच्या समस्या दूर व्हाव्या यासाठी त्यांनी रोजच्या आयुष्यातील काही साधारण वाटणाऱ्या सवयीमध्ये बदल घडवणं गरजेचं आहे. या सवयी कोणत्या हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. दिवसाची सुरुवात सोशल मीडियाने- अलिकडे अनेक तरुण सोशल मीडियाच्या आहारी जाऊ लागले आहे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेक मानिसक आणि शारिरिक समस्या निर्माण होत असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. खास करून दिवसाची सुरुवातच मोबाईल फोन हातात घेऊन केली जाते.

सकाळी उठल्यानंतर सोशल मीडियावर अपडेट तपासले जातात. सकाळी उठल्यानंतर मेंदूला स्थिरावण्यासाठी थोडा वेळ लागतो. मात्र मोबाईलमधील सोशल मीडियावरील पोस्ट किंवा व्हिडीओ पाहून त्याचा मेंदूवर परिणाम होते. यामुळे कोर्टिसोल आणि डोपामाइन हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. परिणामी संपूर्ण दिवस थकवा जाणवतो. यासाठी सकाळी उठल्यानंतर किमान २ तास तरी मोबाईल दूर ठेवावा. यावेळत योगा, मेडिटेशन, वॉक किंवा वर्कआउट अशा अॅक्टिव्हिटी कराव्या.

हे देखिल वाचा-

२. प्रोसेस्ड फूडची आवड- तरुणांमध्ये सकस आहाराएवजी जंक फूड खाण्याची जास्त आवड असल्याचं आढळून येतं. तसचं कामाच्या ओघात असो किंवा आवड म्हणून चुकीच्या वेळी चुकीचे पदार्थ खाल्ले जातात. पिझ्झा, बर्गर किंवा पॅक्ड फूड याकडे तरुणांचा ओढा जास्त दिसतो.

प्रोसेस्ड फूड म्हणजे एक प्रकारचं विषचं आहे. यामुळे शरीरावर हळूहळू अनेक दुष्परिणाम होतात. २०१८मधील एका स्टडीनुसार सिगारेटच्या तुलनेत प्रोसेस्ड फूडच्या सेवनामुळे मृत्यूचा धोका अधिक जास्त असतो. कारण प्रोसेस्ड फूडमुळे मधुमेह, हार्ट डिजीज, वजन वाढणं आणि उच्च रक्तदाबाचा धोका अधिक असतो.

यासाठीच तरुणांने आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आहाराच धान्य, ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश केल्याने शरिराला आवश्यक पोषत तत्व मिळतात.

३. रात्री उशीरा झोपणं- तरुणांमध्ये रात्री उशीरा जेवणं आणि उशीरा झोपण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. झोपण्यापूर्वी देखील बरेच तरुण तासनतास मोबाईलमध्ये व्यतीत करतात. यामुळे डोळ्यांवर ताण तर येतोच. शिवाय उशीरा झोप लागते. अपुरी झोप झाल्याने अनेक शारिरीक आणि मानसिक समस्या निर्माण होतात.

रात्री वेळेत झोप लागावी यासाठी दुपारनंतर चहा, कॉफी किंवा इतर कॅफेनयुक्त पदार्थांचं सेवन करू नये. तसचं अंथरुणात जाण्यापूर्वी अर्धा तास आधीत मोबाईल दूर ठेवावा.

४. उन्हाशी संपर्क नाही- सतत एका खोलीत वेळ घालवणं किंवा सुर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कात न आल्याने अलिकजे व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे अनेक आजार होवू लागले आहेत. सुर्य प्रकाशाच्या संपर्कात न आल्याने सेरोटोनिन हार्मोनसची कमतरता निर्माण होते. यामुळे नैराश्य, चिंता आणि अनेक मानसिक आजार होण्याचा धोका वाढतो. यासाठी रोज सकाळी किमान १५ मिनिटं सुर्यप्रकाशात एक वॉक तरी घ्यावा.

५. रागावर नियंत्रण नसणं- राग येणं ही एक सामान्य भावना आहे. मात्र सारखा राग येणं हे एक मानसिक आरोग्य बिघडल्याचं लक्षण आहे. यामुळे तुम्ही मानसिक तसचं शारिरीक आणि भावनात्मक दृष्टी कमकुवत होता. यासाठी रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

६. जास्त आराम- निरोगी राहण्यासाठी शरीर सक्रिय असणं अत्यंत गरजेचं आहे. शरीराला आराम गरजेचा आहे. मात्र त्यासाठी शारिरीक कष्ट करणंही तितकचं गरजेचं आहे. अलिकडच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये शारीरीक कष्टाची कामं कमी झाली आहेत. त्यात अनेक तरुण व्यायाम किंवा दिवसभर एक्टिव्ह राहण्यासाठी खास प्रयत्न करत नाहीत. यामुळे शरीर सुस्तावतं. अशात लठ्ठपणा आणि सांधेदुखीच्या इतर समस्या उद्दभवतात.

तरुण वयातच हाडं कुमकुवत होतं, चष्मा लागणं किंवा दृष्टीवर परिणाम होणं, कोलेस्ट्रॉल वाढणं अशा अनेक समस्या दूर करायाच्या असतील तर या सवयी बदलणं गरजेचं आहे.

टॅग्स :lifestyleAge