Banana Eating Tips : केळी खाल्ल्यानंतर या गोष्टी कधीच खायच्या नाहीत, पण का?

केळी आणि काही गोष्टी एकत्र खाल्ल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो
Banana Eating Tips
Banana Eating Tipsesakal

Banana Eating Tips :   आपल्या आहार शास्त्रात काही गोष्टी कटाक्षाने पाळण्याचा सल्ला दिला जातो. आपलं आरोग्य सुदृढ रहावं यासाठीच काही नियम बनवले गेले आहेत. आता हेच बघा ना, केळी खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाऊ नयेत असं सांगितलं जातं. कारण केळी आणि काही गोष्टी एकत्र खाल्ल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

केळी आपल्याला सहज उपलब्ध होणारे फळ आहे. तसेच त्यामध्ये असलेले पोषक घटकही जास्त आहेत. जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात केळीचा समावेश केला तर तुम्हाला आरोग्यावर चांगले परिणाम दिसू शकतात. केळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ए, बी, सी आणि व्हिटॅमिन बी 6 असते. जर तुमचे वजन जास्त असेल तर केळी तुम्हाला ते कमी करण्यास मदत करते आणि तुमचे आतडे देखील निरोगी ठेवते.(Lifestyle)

Banana Eating Tips
Banana Side Effects : या 5 आजारांनी ग्रस्त असाल तर अजिबात खाऊ नका केळी, फायद्याऐवजी वाढेल त्रास...

हे मज्जासंस्था मजबूत करते. तज्ज्ञांच्या मते, केळी पिकल्यावर त्यामध्ये पोषक तत्वांची पातळी सतत वाढत जाते. काळ्या रंगाची केळी पांढऱ्या रक्तपेशींसाठी हिरव्या रंगाच्या केळ्यांपेक्षा 8 पट जास्त प्रभावी आहेत.

याशिवाय केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे वजन कमी करण्यास आणि पोटाच्या अनेक समस्या टाळण्यास उपयुक्त आहे.  पण, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे केळी खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

Banana Eating Tips
Banana Side Effects : या 5 आजारांनी ग्रस्त असाल तर अजिबात खाऊ नका केळी, फायद्याऐवजी वाढेल त्रास...

केळीमधील पोषक घटक पुढीलप्रमाणे –

  • पोटॅशिअम – ९ टक्के

  • व्हिटॅमिन बी 6 – ३३ टक्के

  • व्हिटॅमिन सी – ११ टक्के

  • मॅग्नेशिअम – ८ टक्के

  • तांबे – १० टक्के

  • मॅगनिज – १४ टक्के

  • कार्ब्स – २४ ग्रॅम

  • फायबर्स – ३.१ ग्रॅम

  • प्रोटिन्स – १.३ ग्रॅम

  • फॅट्स – ०.४ ग्रॅम

  • कॅलरिज – १०५ कॅलरिज

केळी खाल्ल्यानंतरही या 3 गोष्टी खाऊ नका

केळी खाल्ल्यानंतर दही खाऊ नये

दही  हा आंबट आणि थंड पदार्थ आहे. उन्हाळ्यात दही ताक खाण्याचा सल्ला दिला जातो. नक्कीच तुम्ही ती गोष्ट पाळा. कारण, शरीर डिहायड्रेड होऊ नये म्हणून दह्याचे सेवन करणे फायदेशीर असते. पण, तुम्हाला माहितीय का की, केळी खाल्ल्यानंतर दही खाऊ नये, त्यामुळे अपचन आणि अॅसिडिटीचा त्रास होतो. 

केळी आणि दही दोन्ही एकमेकांवर प्रतिक्रिया देतात आणि कठोर प्रोबायोटिक बनतात. यामुळे पोटात गॅस, अॅसिडिटी आणि अपचन होऊ शकते. म्हणून केळी खाल्यानंतर दही खाणे टाळावे.

Banana Eating Tips
Banana Peel For Skin : तुम्ही फेकत असलेलं केळीचं सालही आहे फायद्याचं; चेहरा करेल झटक्यात चमकदार

केळी खाल्ल्यानंतर डाळी खाऊ नका

केळी खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारची डाळ खाऊ नये. मसूर, तूर अशा डाळींमध्ये अनेक पोषक घटक असतात. पण केळी खाऊन यांचे सेवन करणे हानिकारक असते. आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक असू शकते.  याशिवाय केळीचे फायबर प्रोटीन चयापचय कमी करू शकते, ज्यामुळे पोटदुखीसह सर्व प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

केळी खाल्ल्यानंतर चहा पिऊ नका

चहा आणि केळी हे दोन्ही वाईट अन्न संयोजन आहेत आणि ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकतात.  म्हणूनच केळी खाल्ल्यानंतर कधीही चहा पिऊ नका.  किंवा चहा प्यायल्यानंतर केळी खाऊ नका.  यामुळे बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा समस्या होऊ शकतात.

या गोष्टीही पाळा

एका दिवसात एक किंवा दोनच केळी खावीत.

केळे हे एकदम सकाळी उपाशीपोटी किंवा रात्रीच्या वेळी खाऊ नये, कारण यामुळे कफाचा त्रास होण्याची शक्यता असते.

सकाळी उपाशीपोटी केळी खाल्यामुळे पोटात गॅस होणे, पोटदुखी, उलटी, अतिसार यासारखे त्रास होऊ शकतात.

केळे खाल्याने मुलांना सर्दी किंवा कफाचा त्रास होऊ नये यासाठी मुलांना केळे हे दुपारच्या वेळेसच खाण्यास द्यावे.

Banana Eating Tips
National Banana Day 2023 : ..तर केळी उत्पादनातील नेतृत्व पश्चिम महाराष्ट्राकडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com