Banana Peel For Skin : तुम्ही फेकत असलेलं केळीचं सालही आहे फायद्याचं; चेहरा करेल झटक्यात चमकदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Banana Peel For Skin

Banana Peel For Skin : तुम्ही फेकत असलेलं केळीचं सालही आहे फायद्याचं; चेहरा करेल झटक्यात चमकदार

Skincare Tips : केळी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. केळी शरीर सुडौल बनवण्यात मदत करतं. अनेक बॉडी बिल्डर केळ्याचं सेवन स्नायू बनवण्यासाठी करतात. तुम्हाला माहित नसेल की केळ्याप्रमाणेच केळ्याची सालंही शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. केळ्याची साल आपला अनेक समस्यांपसून सुटका करु शकते.

केळी हे प्रोटीनची भरपूर प्रमाण असलेलं चवदार फळ आहे. केळीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन बी 6 सारखे पोषक घटक असतात. यात फायबर असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. हे आपल्याला ऊर्जा देण्याचे काम करते. केळी अनेक प्रकारे खाल्ली जाते.

केळी आपण स्मूदी, फ्रुट सॅलेड आणि शेकच्या स्वरूपात देखील घेऊ शकता. पण केळी खाल्ल्यानंतर आपण अनेकदा त्याची साल फेकून देतो, पण ती साल त्वचेसाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहित आहे का?त्यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते.

हे आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्याचे काम करते. मुरुम दूर करण्यासाठी आपण केळीची साल अनेक प्रकारे वापरू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या प्रकारे तुम्ही त्वचेसाठी केळीची साल वापरू शकता.

साध्या केळीच्या सालीचा वापर करा

सर्वप्रथम चेहरा पाण्याने स्वच्छ करावा. आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा मेकअप राहणार नाही याची काळजी घ्या. यानंतर केळीची साल घ्यावी. मान आणि चेहऱ्यावर थोडा वेळ मसाज करा. १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. यानंतर साध्या पाण्याने त्वचा धुवून टाकावी. याचा तुम्ही नियमित वापर करू शकता.

केळीची साल आणि मध

मुरुमांच्या समस्येवर मात करण्यासाठी आपण केळीची साल आणि मध देखील वापरू शकता. त्यासाठी केळीची साल घ्या. केळीची साल बारीक करून पेस्ट तयार करा. एका बाऊलमध्ये बाहेर काढा. त्यात एक चमचा मध घाला. या दोन्ही गोष्टी एकत्र करून चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. थोडा वेळ त्वचेवर मसाज करा. १५ ते २० मिनिटे त्वचेवर लावा. यानंतर साध्या पाण्याने त्वचा धुवून टाकावी. ही पेस्ट तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा वापरू शकता.

Banana Peel For Skin

Banana Peel For Skin

केळीची साल आणि कोरफड

केळीच्या सालीची पेस्ट तयार करा. त्यात १ ते २ चमचे कोरफड जेल घालावे. हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. चेहऱ्यावर आणि मानेवर १० मिनिटे मसाज करा. हा थर १५ मिनिटे असेच त्वचेवर ठेवा. यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. याचा वापर तुम्ही आठवड्यातून ४ वेळा करू शकता. हे आपल्याला मुरुमांच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करेल.

चेहऱ्यावरील सुरकूत्या घालवण्यासाठी

त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी केळीच्या सालीचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत, जे त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. केळीच्या सालीमुळे पिंपल्सची समस्या कमी होते. यासाठी केळीची साल पिंपल्स आलेल्या भागावर चोळा. हा उपाय आठवडाभर केल्यानंतर तुम्हाला त्वचेवर फरक दिसेल. तुम्हाला पिंपल्सपासून सुटका मिळेल.