World Kindness Day : दयाळूपणा जपताना 'हे' नक्की करा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

दयाळूपणा हा स्वभाव आहे. तो आत्मसात केला की आपण आनंदी आणि हसतमुख राहू शकतो त्यामुळे आपल्या आसपास नेहमी सकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांना आपल्या जीवनात जोडून शकतो. 

जागतिक दयाळू दिन हा १९९८ सालापासून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिनाची संकल्पना जागतिक दयाळू चळवळीतून निर्माण झाली. यामध्ये ऑस्ट्रेलिया, थायलंड, अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांचा पुढाकार होता. सर्व लोकांनी एकत्र यावे, माणुसकी जपावी, हिंसात्मक कृत्यांना आळा बसावा अशा उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. 

सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामात व्यस्त असतो. आपण आपल्या जगात इतके हरवलेले असतो की आसपास काय चालू आहे याचे, कित्येकदा आपल्याला भाण नसते. आपण इतंराशी कसे वागतो याकडे आपण कधीच लक्ष देत नाही. अनेकांना विविध प्रकारचे ताणतणाव असतात. त्यामुळे चिडचिडपणाची वृत्ती वाढत आहे. माणूस टेंशनमध्ये असला की एकाचा राग दुसऱ्यावर काढतो. त्यामुळे जवळचे व्यक्ती सुद्धा विनाकारण दुखावले जातात. त्यामुळे विनाकारण नकारात्मकरता आपल्यामध्ये निर्माण होत राहते.

आपल्यामध्ये निर्माण झालेली ही नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आपल्याला दयाळूपणा आत्मसात केला पाहिजे. रोजच्या जीवनात आपण कसे वागतो, बोलतो याकडे लक्ष द्यावे. नेहमी शांतपणे, नम्रपणे बोलावे. दयाळूपणा हा स्वभाव आहे. तो आत्मसात केला की आपण आनंदी आणि हसतमुख राहू शकतो त्यामुळे आपल्या आसपास नेहमी सकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांना आपल्या जीवनात जोडून शकतो. 

दयाळूपणा जपताना हे नक्की करा 
1) सर्वात आधी स्वतः दयाळूपणा आत्मसात करा.
2) स्वतःसह इतरांसोबत दयाळूपणाने वागा.
3) प्राण्यांसाठी मनात दया ठेवा.
4) जे लोक तुमची काळजी करताना त्यांच्याशी आपुलकीने वागा
5) अडचणीत असलेल्या लोकांना मदत करा.

स्वत:मधील दयाळूपणा असा जपा
1) आनंदी आणि हसतमुख रहा.चेहऱ्यावर नेहमी हलकं स्मित असावे
2) प्रत्येक व्यक्तींप्रती मनात नेहमी आदराची भावना ठेवा. कोणालाही कमी लेखू नका.
3) आपण काय बोलतो यावर नियंत्रण ठेवा. बोलताना आपले बोलणे मृदू असावे. 
4) समोरच्याचे म्हणणे ऐकूण घ्या. दुसरी बाजु समजून घेण्याचा प्रयत्न करा.
5) रागावर नियंत्रण असू द्या. विनाकारण चिडचिड होऊ देवू नका. शांत रहा.
6) ताणतणाव आल्यास आपल्या आवडता छंद जोपासावा. गाणी ऐका, पुस्तक वाचा.
7) एखादी व्यक्ती आपल्यावर चिडली असेल तर, त्या व्यक्तीला स्मितहास्य ठेवून सॉरी म्हणा.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be kind and Celebrate World Kindness Day