पुरूषांना चेहऱ्यावर हवा ग्लो; तर या आहेत प्रभावी ब्युटी टिप्स

पुरूषांना चेहऱ्यावर हवा ग्लो; तर या आहेत प्रभावी ब्युटी टिप्स

जळगाव ः  सुंदर व नितळ त्वचेसाठी महिला फॅशियल आणि घरगुती उपचारांचा वापर सतत काळजी करत असतात. पण पूरुष मात्र विषेश करून आपल्या चेहऱ्याची काळजी काळजी घेत नाहीत. त्यात धावपळ व कामात चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी वेळ पुरूषांना मिळत नसतो. महिन्या-दिड महिन्यातून एका सलून मध्ये गेल्यावर तेवढी चेहऱ्यावर मसाज अखवा वाॅश केला जातो तेवढेचं 


आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये मुले आपल्या त्वचेची विशेष काळजी घेत नाहीत. परंतु महिलांप्रमाणेच पुरुषांनीही आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. मॉइस्चरायझिंग, टोनिंग त्वचेच्या काळजीसाठी वापरली पाहिजे. चला हे जाणून घ्या की मुलांनी आपल्या त्वचेच्या काळजीसाठी या गोष्टी वापरल्या पाहिजेत.

फेस क्लीन्सर
घराबाहेर पडतांना चेहऱ्याला प्रथम धुळीचा सामना करावा लागतो. तसेच प्रदूषणाचा परिणाम चेहऱ्याव दिसून येतो. अशा परिस्थितीत चेहऱ्याची त्वचेची काळजी घेण्यासाठी क्लीन्सर वापरावे. दररोज घरी आल्यानंतर चेहऱ्यावर  क्लीन्सर लावावे. ज्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली घाण दूर होईल आणि ग्लो येईल.

प्रभावी टोनर
त्वचा काळजीसाठी टोनर अतिशय प्रभावी उपाय असून टोनर वापरुन त्वचेचे छिद्र घट्ट करतात. जेणेकरून चेहर्‍यावर मुरुम येत नाही. 

ड्राय स्किनवर मॉइश्चरायझर
मॉइश्चरायझर त्वचेच्या प्रकारानुसार वापरला पाहिजे. कोरड्या (ड्राय) त्वचेवर मलईचे मॉश्चरायझर अतिशय प्रभावी आहे. तर तेलकट त्वचेच्या वापरकर्त्यांनी हलके मॉश्चरायझर लावावे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com