केस लांबसडक, स्ट्राँग बनवण्यासाठी वापरा स्ट्रॉबेरी हेअर मास्क

केसांची चांगली वाढ होण्यासाठी उपयोगी घरातच बनवा स्ट्रॉबेरी हेअर मास्क. जाणून घ्या हे मास्क तयार करण्याची सोपी पद्धत.

केस लांबसडक, स्ट्राँग बनवण्यासाठी  वापरा स्ट्रॉबेरी हेअर मास्क

कोल्हापूर :प्रत्येक महिलेला वाटते की आपले केस काळेभोर दाट आणि लांब असावे. परंतु यासाठी या केसांना लागणारी पोषक तत्वे आवश्यक असतात. आपल्या अत्यंत व्यस्त कामामध्ये केसांसाठी एवढा वेळ देणे हे कोणालाच शक्य होत नाही. याशिवाय आपल्या खाण्याच्या सवयी यामुळे ही केसांच्या वर परिणाम होतो. त्यासाठी आठवड्यातून एक वेळा तुम्ही या केसांच्या कडे लक्ष दिला तर तुमच्या केसांची वाढ चांगली होईल चमकदार होतील आणि ते मजबूत होतील.केसांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला कोणताही जास्त खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही स्ट्रॉबेरी चा योग्य वापर करून त्याला पोषक तत्वे देऊ शकता. तुम्हीघरात स्ट्रॉबेरी हेअर मास्क तयार करून केसांना लावू शकता.

स्ट्रॉबेरी मध्ये असतात ही पोषकतत्वे

1 स्ट्रॉबेरी मध्ये विटामिन सी असते. ते लावल्यानंतर केसातील कोंडा दूर होतो

2 यामध्ये असणारी पॉलिफिनॉल तत्व anti-inflammatory तयार करततात. आणि केसांच्या मुळाच्या ठिकाणी निर्माण होणारी समस्या हे दूर करतेात.

3) स्ट्रॉबेरी मध्ये असणारे अक्सिडेंट केसांना सूर्यप्रकाशापासून वाचवते .

4) स्ट्रॉबेरी मध्ये प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपली केस चमकदार आणि मजबूत होतात एवढेच नव्हे तर केसांची वाढ ही चांगल्या पद्धतीने होते.

तयार करण्याची पद्धत

साहित्य :

10 स्ट्रॉबेरी, एक मोठा चमचा कॅस्टर ओईल, 1 मोठा चमचा मध

कृती:

स्ट्रॉबेरी स्वच्छ करून घ्या. आणि त्यावर असणारे लहान काटे काढून टाका. त्यानंतर मिक्सर ग्राइंडर मध्ये स्ट्रॉबेरीची पेस्ट तयार करून घ्या. या मिश्रणामध्ये कॅस्टर ऑइल आणि मध टाका. हे तयार झालेले मिश्रण केसांच्या मुळाशी लावा आणि हलक्या पद्धतीने हेड मसाज करा. आता 40 ते 60 मिनिटे हे मिश्रण ठेवा त्यानंतर केस शाम्पूने चांगल्या पद्धतीने धुऊन घ्या. आठवड्यातून एक वेळा असे मास्क तुम्ही लावू शकता.

केसांसाठी कसे फायदेशीर

स्ट्रॉबेरी उन्हाळ्याच्या दिवसात तुमच्या केसांच्या मुळाशी चिकटपणा तयार होत असेल तर स्ट्रॉबेरी हेअर मास्क लावण्यामुळे ते कंट्रोल मध्ये राहते.

चेहऱ्यावरील छिद्रा प्रमाणेच केसांच्या मुळाच्या त्वचेवरील छिद्रे बंद होतात. स्ट्रॉबेरी हेअर मास्क लावल्यामुळे छिद्रे उघडली जातात व त्यामुळे केसांना अधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळते. त्यामुळे केसांची वाढ चांगली होते .

जर केस तुटत असतील तर स्ट्रॉबेरी हेअर मास्कमुळे हा प्रकार कमी होतो आणि तुमचे केस अधिक मजबूत होतात .

जर तुमचे केस गळत असतील तर स्ट्रॉबेरी मास्क वरदान ठरू शकते. यामुळे तुमचे केस गळणे थांबतात.

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com