esakal | ब्लैकहेड्स रिमूव्हरने कोणताही त्रास होणार नाही जर तुम्ही या गोष्टीची काळजी घेतला तर

बोलून बातमी शोधा

ब्लैकहेड्स रिमूव्हरने कोणताही त्रास होणार नाही जर तुम्ही 'या' गोष्टीची काळजी घेतला तर
ब्लैकहेड्स रिमूव्हरने कोणताही त्रास होणार नाही जर तुम्ही 'या' गोष्टीची काळजी घेतला तर
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोल्हापूर : त्वचेवरील ब्लैकहेड्स रिमूव्ह करण्यासाठी ब्लैकहेड्स रिमूवरचा वापर केला जातो. परंतु कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी करू नयेत याबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे महिलांच्या चेहऱ्यावर काळे डाग असतात हे काळे डाग नैसर्गिक सौंदर्य कमी होण्यास कारणीभूत ठरतात. ब्लॅक हेड्स ची समस्या विशिष्ट कारणाने सुरू होते. त्वचेवर तयार होणारे नैसर्गिक तेल , मृतपेशी व चेहऱ्यावर वारंवार धूळ साचले तर त्यामधील हेअर फॉलिकल्स ब्लॉक होतात आणि त्याचे परिणाम ब्लॅकहेड्स मध्ये दिसून येते. अश्यावेळी हे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी ब्लॅकहेड रिमूव्हर चा वापर केला जातो.

ब्लॅक हेड कमी करण्यासाठी या साधनाचा चांगला उपयोग होतो. परंतु हे साधन वापरताना काही सावधानता बाळगणे आवश्यक आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर केला तर वेदना बरोबरच चेहऱ्यावर कायमस्वरूपी काही डाग राहण्याची शक्यता असते. याठिकाणी तुम्हाला ब्लॅकहेड रिमूव्हर चा वापर करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबाबत माहिती देत आहोत.

अस्वच्छ ब्लॅकहेड एक्सट्रैक्टर वापरू नका

ब्लैकहेड्स एक्सट्रैक्टर चा वापर करताना हा नियम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तुमचे ब्लॅकहेड्स वापरत असताना नेहमी स्वच्छ उपकरणाचा वापर करा.

हे साधन असंच असेल तर आपल्या चेहऱ्यावरील छिद्रांना संक्रमित करते त्याच बरोबर अनेक त्वचेचे आजार होऊ शकतात यासाठी या गोष्टींची काळजी घ्यायची वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर ब्लॅकहेड एक्सट्रॅक्टर गरम पाणी आणि साबनाच्या मदतीने स्वच्छ करा. त्याच बरोबर हे साधन स्वच्छ जागी ठेवा.

सुरुवातीला करा एक्सफोलिएट

ब्लॅक हेड रिमूवर किंवा ब्लॅक हेड एक्स्त्रॅक्टर चा वापर करण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ तसेच एक्सफोलिएट करण्याचे विसरू नका. एक्सफोलिएशन आपल्या त्वचेवरील छिद्रे उघडे करतात. त्यामुळे एक्सट्रॅक्‍टरचा वापर करणे सहज सोपे बनते.

चेहऱ्याला द्या स्टीम

ब्लॅक हेड्स काढून टाकल्यानंतर आपल्या चेहऱ्याला आराम वाटावे यासाठी एक्सफोलिएट केल्यानंतर स्टीम जरूर द्या त्यामुळे चेहऱ्यावरील त्वचेच्या छिद्रा उघड्या होतात आणि आपल्यास ब्लॅक हेड्स काढणे सोपे जाते. चेहऱ्याला स्टीम दिल्यानंतर ब्लॅक हेड्स काढताना तुम्हाला आश्चर्यकारकरीत्या परिणाम पाहावयास मिळतात.

ब्लॅकेड रिमूव्हर चा योग्य तर्‍हेने वापर करा

.ब्लॅक हेड रिमूवर किंवा ब्लॅकहेड एक्सट्रॅक्टर चा वापर करताना कोणतीही चूक होता उपयोगाचे नाही. जेव्हा तुम्ही ब्लॅक हेड रिमूव्हर वापर करता त्यावेळी तुम्ही पहिला त्वचेला एक्सफोलिएट व स्टीम देता अशावेळी ब्लॅक हेड्स बाहेर काढण्यासाठी फारसा त्रास होत नाही. तुम्ही थोडेसे पुश केला तर ब्लॅकहेड्स निघून जातात जर तुम्हाला ब्लॅकहेड्स काढण्यासाठी अडचणी येत असतील तर काही वेळासाठी ते सोडून द्या ब्लॅकहेड्स काढताना तुम्हाला जर अधिक वेदना होत असतील तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर तसेच व्रण राहतात.

गरज लागली तरच ब्लॅकहेड रिमूव्हर चा वापर करा.

ब्लॅक हेड रिमोटचा वापर करण्यापूर्वी तुम्ही त्याच्यावर ब्लॅकहेड्स आहेत का याची खातरजमा करा. अनेक वेळा यामध्ये सीबम फिलामेंट हा घटक असतो याला आपण ब्लॅकहेड्स असे म्हणतो. सीबम एलेमेंट्स असा घटक आहे की ते आपल्या त्वचेवर निर्माण होतात आणि जेव्हा आपल्या त्वचेवर साबणाचा अतिरिक्त वापर होतो अशा वेळी हे ब्लॅकहेड्स अधिक वाढतात.