Brother's Day : ब्रदर्स डे ला भावाला पाठवा या खास शुभेच्छा अन् व्यक्त करा प्रेम l brothers day 2023 send these amazing wishes to your sweet loving brother | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brother's Day

Brother's Day : ब्रदर्स डे ला भावाला पाठवा या खास शुभेच्छा अन् व्यक्त करा प्रेम

Brother's Day : बहिण भावाचं नातं फार खास असतं यात काही वादच नाही. लहानपणापासून भांडतात, एकत्र खेळतात आणि सोबत मोठे होतात. या काळात चांगल्या वाइट परिस्थितीत एकमेकांची साथ देंंत एकमेकांचं बळ वाढवतात. आज ब्रदर्स डे तेव्हा आजच्या दिवशी तुमचं प्रेम शब्दात व्यक्त करा. त्यांना पाठवा हे खास मेसेजेस.

1) आभाळाची साथ आहे

अंधाराची रात आहे

मी कोणाला घाबरत नाही

कारण माझ्या पाठीवर

माझ्या भावाचा हात आहे

Happy Brother's Day

2) दादा दादा म्हणत आले

आपलं नातं जपत आले

अशीच साथ आणि प्रेम काय असो आपली

देवापुढे काय प्रार्थना करत आले

Happy Brother's Day

3) आयुष्याच्या वाटेवरती

दादा ताईची जोडी भारी आपली

सुख दु:खाचे आपण सोबती

आयुष्यभर अशीच जपू नाती

Happy Brother's Day

4) तुझं माझं जमेना

तुझ्याशिवाय करमेना

दादा तू हट्टी, मस्तीखोरही तूच

पण कायम पाठीशी साथही देणारा तूच

Happy Brother's Day (Message)

5) आईने विचारलं तेव्हा सांगितलं हवाय भाऊ

म्हणाले सोबत एकाच ताटात जेऊ

सोबत खेळू, सोबत राहू

तू मिळावास म्हणूस आईने केलेला तू नवसाचा माझा भाऊ

Happy Brother's Day (Quote)

6) भावापेक्षा अधिक मौल्यवान कोणतीही संपत्ती नाही,

भावापेक्षा चांगली कोणतीही प्रतिमा नाही,

भावंड ही कच्च्या धाग्यासारखी आहेत..हे,

पण या धाग्यापेक्षा आणखी मजबूत कोणतीही साखळी या जगात नाही!

Happy Brother's Day