Cause Of Heart Attack : कमी झोप घेणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका अधिक; या गोष्टी लक्षात ठेवा | Cause Of Heart Attack : cause of heart attack lack of sleep can cause heart attack | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cause Of Heart Attack

Cause Of Heart Attack : कमी झोप घेणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका अधिक; या गोष्टी लक्षात ठेवा

Cause Of Heart Attack : रात्री 10 ते 11 दरम्यान झोपणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. याचाच अर्थ जे लोक कमी झोप घेतात, ज्यांची झोप पुर्ण होत नाही त्यांच्यामध्ये हृदय विकाराचा धोका अधिक असतो.

कॅन्सरसारखा मानला जात असलेल्या हृदयविकाराच्या झटक्याच्या घटनांमध्ये देशभरात झपाट्याने वाढ होत आहे. लोक आता लहान वयातच हृदयविकाराने त्रस्त झाले आहेत आणि यामुळे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूहोण्याचा धोका वाढतो.

हा अभ्यास झोपेचे प्रमाण आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका यांच्यातील दुवा सुचवितो, जो लोकांसाठी प्राणघातक ठरू शकतो.(Cause Of Heart Attack : cause of heart attack lack of sleep can cause heart attack)

जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात असे म्हटले आहे की, कमी झोप घेतल्यास हृदयरोगासारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजाराचा धोका तीन पटीने वाढतो.

या संशोधनात असेही सांगण्यात आले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती 7 तासांपेक्षा कमी झोपते तेव्हा त्यांच्या शरीरातील एंडोथेलियल पेशींची क्रिया कमी होते, जी हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा प्रसार कमी करण्यास जबाबदार असते.

संशोधनात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना घड्याळाप्रमाणे एक उपकरण देण्यात आलं होतं. याद्वारे त्यांची झोपण्याची आणि जागण्याची माहिती मिळवली जात होती. सहा वर्षे या स्वयंसेवकांच्या हृदय आणि रक्ताभिसरणाच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला.

यापैकी केवळ 3 हजार हून अधिक प्रौढांना हृदयरोग झाला. यापैकी बहुतांश लोक रात्री 10 ते 11 वाजल्यानंतर किंवा त्याआधी झोपत होते. झोपेचा कालावधी आणि झोपेमध्ये अनियमिततासुद्धा आढळली.

याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. या संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये झोपेच्या कमतरतेची लक्षणे दिसून आली आहेत, जी त्यांच्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकतात.

आपल्याला दररोज किती तास झोप आवश्यक आहे?
सामान्यत: प्रौढ व्यक्तीला 7-9 तासांची झोप आवश्यक असते. मुले आणि तरुणांसाठी अधिक झोप आवश्यक आहे. झोप घेतल्याने आपल्या शरीराला विश्रांती मिळते ज्यामुळे आपण निरोगी आणि तंदुरुस्त राहतो.

याव्यतिरिक्त, झोपेमुळे स्मरणशक्ती वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते आणि उत्तेजना कमी होते. झोपेच्या कमतरतेमुळे वेदना, थकवा, मेंदूचा ताण, हृदयविकार यासारख्या आजारांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

यावरील उपाय काय?

  • माणसांना रोज सात ते आठ तासांची झोप सर्वसाधारणपणे आवश्यक आहे. मात्र, ज्यांची झोप त्यापेक्षा कमी होते त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.

  • झोप येण्यासाठी जेवणाची वेळ पाळणे आणि रात्री दहाच्या दरम्यान झोपी जाणे.

  • आठ तासांच्या वर एखादा तास जास्त झोप घेतली चालेल पण कमी करू नका.

टॅग्स :Sleep