International No Diet Day : डाएटला द्या एक दिवस सुट्टी!

तुम्हाला International No Diet Day विषयी माहित आहे का?
International No Diet Day : डाएटला द्या एक दिवस सुट्टी!

डाएट (Diet ) हा शब्द आजच्या घडीला कोणालाही नवीन राहिलेला नाही. कोणी वजन कमी करण्यासाठी,कोणी फिट राहण्यासाठी तर काहीजण पथ्य म्हणून डॉक्टरांनी दिलेलं डाएट फॉलो करत असतात. त्यामुळे दैनंदिन जीवनात प्रत्येक जण ठराविक आखून दिलेलाच आहार घेत असतात. यात अनेक जण रविवारी चिट डे म्हणून डाएटपासून सुट्टी घेऊन आपल्याला हवे ते पदार्थ मनसोक्तपणे खात असतात. यात काहींचा चिट डे रविवारी असतो, तर काही जणांचा मनात येईल तेव्हा असतो. परंतु, एकाच दिवशी सगळ्यांनी चिट डे करावा असाही एक दिवस आहे, जो जागतिक स्तरावर मान्य करण्यात आला आहे. आतापर्यंत आपण अने इंटरनॅशनल डे सेलिब्रेट केले असतील. पण, तुम्हाला International No Diet Day विषयी माहित आहे का? ६ मे रोजी संपूर्ण जगात International No Diet Day साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जण आपल्या डाएटला सुट्टी देतात. (celebrate international no diet day on 6 may)

International No Diet Day : डाएटला द्या एक दिवस सुट्टी!
Coronavirus : मीठ, साखरेवर ठेवा नियंत्रण; फॉलो करा असा डाएट प्लॅन

इंग्लंडमध्ये मॅरी इवांस यांनी ६ मे १९९२ मध्ये पहिला No Diet Day साजरा केला. त्यानंतर १९९८ पासून संपूर्ण जगात International No Diet Day हा दिवस साजरा होऊ लागला.

या दिवशी प्रत्येक जण डाएट, वाढतं वजन, कॅलरीज यांचा विचार न करता आपल्याला हवं ते आणि हवं तितक्या प्रमाणात बिंधास्त खातात. त्यामुळे हा दिवस अनेकांचा आवडता दिवस म्हणूनही ओळखला जातो.

डाएटचे 'हे' प्रकार माहित आहेत का?

पालेओ डाएट, किटो डाएट, डॅश डाएट, व्हिगन डाएट, एल्कलाइन डाएट, फॅड डाएट, Gm डाएट, लूनर डाएट, बेबी फूड डाएट,ज्युस डाएट,रॉ फूड डाएट, गडद निळ्या रंगाच्या ताटात जेवण करणे, आरश्यासमोर बसून जेवणे असे अनेक प्रकारचे डाएट लोक करत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com