
Chaitra Navratri 2023 : नवरात्रीमध्ये ट्राय करा 'हे' एथनिक हटके आउटफिट्स
Chaitra Navratri 2023 : सणवार आले की बहुतेक स्त्रिया पारंपरिक पोशाख घालण्यास प्राधान्य देतात. आता तर नवरात्रीचा सण देखील जवळ येत चाललाय आणि या सणासुदीच्या काळात तुमचं कपाट तयार हवं. यासाठी आम्ही काही टिप्स शेअर केल्या आहेत ज्यामुळे सणासुदीच्या काळातही तुम्ही वेगवेगळे आउटफिट्स ट्राय करू शकता.
सणासुदीच्या काळात तुम्ही एथनिक आऊटफिट्स वापरून पाहू शकता. हे आऊटफिट्स तुमच्या लुकमध्ये आकर्षकपणा आणण्यासाठी काम करतील. साध्या अनारकली कुर्त्यापासून साडीपर्यंत अनेक प्रकारचे आऊटफिट्स तुम्ही ट्राय करू शकता. (Chaitra Navratri 2023 women designer ethnic wear outfits)

एथनिक को-ऑर्ड सेट
एथनिक को-ऑर्ड सेट - तुम्ही एथनिक को-ऑर्ड सेट वापरून पाहू शकता. आजकाल को-ऑर्डर सेट ट्रेंडमध्ये आहेत. या पारंपरिक पोशाखात सोनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे.

ब्राइट साड्या
ब्राइट साड्या - तुम्ही ब्राईट कलरच्या साड्याही घालू शकता. या प्रकारची साडी प्रसंगी योग्य आहे. या साडीमुळे तुम्हाला एलिगेंट लुक मिळेल.

शरारा सेट
शरारा सेट - तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये या प्रकारचा स्टायलिश शरारा सेट ॲड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही शरारा सेट कमीत कमी अॅक्सेसरीजसह स्टाइल करू शकता. यामुळे तुम्हाला सिंपल आणि स्टायलिश लुक मिळेल.

सिंपल अनारकली
सिंपल अनारकली - तुम्ही सिंपल अनारकली ड्रेसही घालू शकता. या प्रकारचा ड्रेस सणाच्या हंगामासाठी खूप चांगला जाईल. यामुळे तुम्हाला आकर्षक लुक मिळेल. यासोबत तुम्ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी ट्राय करू शकता.