आता घरबसल्या PAN CARD मिळवा, जाणून घ्या प्रक्रिया

तुम्ही आधार कार्डच्या मदतीने घरबसल्या झटपट पॅन कार्ड मिळवू शकता.
Pan Card Application Process
Pan Card Application Processsakal

सरकारकडून अशी अनेक कागदपत्रे जारी केली जातात ज्याच्या मदतीने आपण अनेक प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो. असंच एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड. पॅनकार्डशिवाय अनेक महत्त्वाची कामे रखडतात. तुम्हाला पॅन कार्ड बनवायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे अगदी घरबसल्या तुम्ही पॅन कार्ड काढू शकता.

सर्व प्रथम आधार कार्ड आणि पॅन कार्ड यातला फरक जाणून घ्या. आधार कार्ड ओळखपत्र म्हणून वापरले जाते, तर पॅन कार्ड आर्थिक दस्तऐवज म्हणून वापरले जाते. तुम्ही आधार कार्डच्या मदतीने घरबसल्या झटपट पॅन कार्ड मिळवू शकता.जाणून घ्या प्रकिया.

Pan Card Application Process
Xiaomiचा स्टायलिश स्मार्टफोन लाँच; 18 मिनिटांत होतो पूर्ण चार्ज; जाणून घ्या वैशिष्ट्ये

प्रक्रिया (PAN Card Application Process) -

सर्वप्रथम इनकम टॅक्सच्या अधिकृत साइटवर जा.

यानंतर तुम्हाला या वेबसाइटवर instant pan card चा पर्याय दिसेल.

Get New PAN पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा

येथे तुम्ही प्रथम आधार क्रमांक टाका, त्यानंतर तुम्ही Confirm पर्यायावर क्लिक करा

त्यानंतर continue ऑप्शनवर क्लिक करा.

त्यानंतर तुमचा ईमेल आयडी टाका.

हे केल्यानंतर, तुम्हाला Credentials टाकावे लागतील, त्यानंतर सबमिट बटण वर क्लिक करा.

एक्नॉलेजमेंट क्रमांक टाकून आधार क्रमांक, Captcha Code आणि ओटीपी भरा.

त्यानंतर तुम्हाला ई-पॅन कार्डची लिंक मिळेल.

त्यावर क्लिक करा त्यानंतर पासवर्ड टाका.

यानंतर तुम्ही पॅन कार्ड डाउनलोड करू शकता.

Pan Card Application Process
टेक्नोहंट : कॉल रेकॉर्डिंगवर आल्या मर्यादा!

तुम्ही 18 वर्षांचे झाल्यानंतर, तुम्हाला पॅन कार्ड मिळणे आवश्यक आहे. तुम्ही पॅनकार्डशिवाय बँके खाते उघडू शकत नाही. एवढेच नाही तर इतर आर्थिक कामातही त्याचा वापर होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com