‘बिल्ट डिझाइन’ सह पूर्ण करा आकर्षक वास्तूचे स्वप्न

आर्किटेक्चर व ग्राहकांमधील दुवा; कामाची स्थितीसुद्धा तपासता येणार
Online Built Design attractive architecture
Online Built Design attractive architecture

नागपूर : ऑनलाइन माध्यमातून घरातील हॉलपासून ते बाथरूममध्ये उपयोगी असणाऱ्या प्रत्येक वस्तू आपण माहिती घेऊन खरेदी करू शकतो. मात्र, आपले घर बांधताना उपयोगी आर्किटेक्चर डिझाईन विषयी ऑनलाइन माध्यमातून आपण कधी माहिती घेतली किंवा डिझाइन पाहिले का? ही सुविधा आता ‘बिल्ट डिझाईन’ने उपलब्ध करून दिली आहे. शहरातील युवा आर्किटेक्चर अभिजित मदेशीया याने ही संकल्पना अस्तित्वात आणली आहे.

ग्राहकांच्या या अडचणी लक्षात घेता अभिजितने हे पाऊल उचलले. तसेच, नुकतेच आर्किटेक्चरचे शिक्षण घेतलेल्या मुलांना पक्षकार मिळण्यास अडचणी निर्माण होतात. ही समस्या देखील यामुळे दूर होताना दिसत आहे. या क्षेत्रामध्ये आता संपूर्ण देशातील दीड लाख आर्किटेक्चर व ग्राहकांमधील दुवा म्हणून या स्टार्टअपला पाहिले जात आहे. स्वप्नातील घर बांधण्यासाठी बिल्ट डिझाईनच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या देशभरातील पंधराशे पेक्षा जास्त आर्किटेक्चरचे १२ ते १५ विविध डिझाईन निवडू शकता.

फक्त डिझाईन निवडण्यासाठीच याचा फायदा होणार नसून आपण निवडलेल्या आर्कीटेक्चरद्वारे निवडलेल्या डिझाईनवर सुरू असलेल्या कामाची स्थितीसुद्धा आपण याठिकाणी तपासू शकणार आहोत. या संकल्पनेमुळे आर्किटेक्चर देशाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोहोचू शकणार असून देशात सुंदर वास्तू निर्माण करण्यात या स्टार्टअपचा हातभार लागणार आहे. अभिजित हा सर्वसामान्य कुटुंबात जन्मला आहे. त्याचे वडील याच क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. डिझाईनची अंदाजित रकमेचा आराखडा तयार करण्याचे ते काम करतात. अभिजितने तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या प्रकल्पाला आर्किटेक्चर कुणाल सिंग यांनी मार्गदर्शन केले.

डिझाईन शोधायला काय कराल?

https://builtdesign.in या वेबसाइटला भेट द्या

* बुक फ्री कन्सल्टेशनवर क्लिक करा व माहिती भरा

* कॉलवर मार्गदर्शन घेतल्यानंतर पोर्टफोलिओ सेक्शनवर क्लिक करा

* आपल्या आवडीनुसार घराचे डिझाईन निवडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com