कॉन्टॅक्‍ट लेन्स आणि मेकअप

सणासुदीच्या दिवसात अनेक महिला कॉन्टॅक्‍ट लेन्सचा वापर करतात.
Makeup
MakeupSakal

सणासुदीच्या दिवसात अनेक महिला कॉन्टॅक्‍ट लेन्सचा वापर करतात. अशावेळी डोळ्यांचा मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मेकअप करताना होणाऱ्या चुकामुंळे डोळ्यांमध्ये इन्फेक्‍शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे पुढील गोष्टींची दक्षता घ्यायला हवी.

कॉन्टॅक्‍ट लेन्स लावताना हात चांगल्याप्रकारे स्वच्छ करून स्वच्छ कापडाने पुसा. कॉन्टॅक्‍ट लेन्सला हात लावताना हात स्वच्छ आणि कोरडे असले पाहिजेत. त्यानंतर डोळ्यांवर लेन्स लावण्यापूर्वी लेन्स सोल्युशनने नक्की स्वच्छ करा. याच प्रकारे लेन्स काढल्यावरही स्वच्छ करून बॉक्‍समध्ये ठेवा. यामुळे डोळ्यांना इन्फेक्‍शन होणार नाही.

बाजारात मिळणारी जास्तीत जास्त मेकअप उत्पादने सामान्य डोळ्यांसाठी तयार केलेली असतात. कॉन्टॅक्‍ट लेन्स लावल्याने डोळे अधिक संवेदनशील होतात. त्यामुळे डोळ्यांच्या मेकअपसाठी उत्पादनांची निवड करताना काळजी घ्यावी. हायपोएलर्जेनिक मेकअप उत्पादनांचा वापर करणे अधिक चांगले ठरेल. कारण या उत्पादनामुंळे ॲलर्जी होण्याची शक्‍यता कमी असते.

डोळ्यांचा मेकअप करण्यापूर्वी कॉन्टॅक्‍ट लेन्स काळजीपूर्वक आणि स्वच्छतेने लावा. त्यानंतर प्रायमर लावा, कारण याने शॅडोज आणि लायनर ठीक राहतात. पावडरऐवजी क्रिम शॅडोजचा वापर करा. जेणेकरून डोळ्यांत येणार नाही. क्रीम शॅडोज डोळ्यांमध्ये जास्त जळजळ निर्माण करतात त्यामुळे काळजी घ्यावी. वॉटर बेस्ड क्रीम शॅडोजचा वापर करावा.

कॉन्टॅक्‍ट लेन्स लावणाऱ्यांनी जेल किंवा क्रीम लायनर्सऐवजी पेन्सिल लायनर्सचा वापर करावा. यासाठी लीड असलेल्या पेन्सिलचा वापर करू नये- कारण लीडचे कण डोळ्यांसाठी त्रासदायक असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com