Cool Face Mask For Summer : उन्हाळ्यासाठी भन्नाट फेस मास्क, जे चेहऱ्याला थंडावा देतील अन् त्वचा उजळ बनवतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cool Face Mask For Summer

Cool Face Mask For Summer : उन्हाळ्यासाठी भन्नाट फेस मास्क, जे चेहऱ्याला थंडावा देतील अन् त्वचा उजळ बनवतील

Cool Face Mask For Summer : उन्हाळ्यात त्वचा रूक्ष होते. त्वचा कोरडी पडल्याने चेहरा निस्तेज दिसू लागतो. त्यामुळे चेहऱ्याचा ग्लो गायबच होतो. केवळ ग्लो नाहीतर चेहऱ्याचा दाहही होतो. या दिवसात हिट वाढवणारे पदार्थ, फेसवॉश लांब ठेवलेलेच बरे असतात. कारण, एखाद्या क्रिममुळे त्वचा जळण्याचे प्रकार घडतात.

उन्हाळ्यात चेहरा फक्त काळवंडत नाही तर कोरडा आणि निर्जीवही दिसतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या गरम वाऱ्यांपासून तुमच्या चेहऱ्याची आर्द्रता सुरक्षित ठेवायची असेल, तर तुम्हाला काही थंड फेस मास्क वापरावे लागतील जे तुमच्या चेहऱ्याला संरक्षण देईल.

उष्णतेच्या लाटेमुळे चेहरा आणि नाजूक त्वचा जाळण्यास सुरुवात होईल. उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक परिणाम चेहऱ्यावर होतो आणि तो सुकलेल्या फुलासारखा कोमेजतो. यामुळे चेहरा निस्तेज तर होतोच शिवाय कोरडा आणि निर्जीव दिसू लागतो.

उन्हाळ्यात चेहरा फक्त काळवंडत नाही तर कोरडा आणि निर्जीवही दिसतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या गरम वाऱ्यांपासून तुमच्या चेहऱ्याची आर्द्रता सुरक्षित ठेवायची असेल, तर तुम्हाला काही थंड फेस मास्क वापरावे लागतील जे तुमच्या चेहऱ्याला संरक्षण देईल.

काकडी आणि कोरफड

काकडी आणि कोरफड वेरा फेस मास्क काकडी किसून त्याचा रस काढा. एका वाडग्यात काढा आणि त्यात थोडे कोरफड जेल घाला, चांगले मिसळा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावर थंडी आणि नैसर्गिक ओलावा टिकून राहून त्याची चमकही कायम राहील. काकडी त्वचेला शीतलता देण्यासोबतच त्वचेला आर्द्रता देते आणि जळलेली त्वचा देखील बरी करते. दुसरीकडे, एलोवेरा जेल त्वचेला चमक आणि आवश्यक पोषण देते.

मिंट आणि दही फेस मास्क

दही चेहऱ्याचे पोषण करते आणि मॉइश्चरायझेशन राखते, तर पुदिना उष्णतेच्या लाटेपासून चेहऱ्याचे संरक्षण करून थंड करते. यासाठी तुम्हाला पुदिन्याची काही ताजी पाने घ्यावी लागतील. ही पाने बारीक करून पेस्ट बनवा आणि दह्यामध्ये चांगले मिसळा. मास्कप्रमाणे चेहऱ्यावर लावा.

चंदन आणि गुलाब पाणी

चंदन चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासोबतच पोषण देते तर गुलाबपाणी थंडावा देते. एका भांड्यात एक ते दीड चमचा चंदन पावडर काढा. त्यात गुलाबजल टाकून छान पातळ पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर धुवा. यामुळे चेहऱ्याला गारवाही मिळेल आणि ओलावाही राहील.

बनाना फ्रुटमास्क

बनानामध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे सर्व घटक त्वचेचे आरोग्य सुधारून बाह्य समस्यांपासून आराम देतात. केळ्याचा फ्रूट मास्क बनवण्यासाठी एका वाटीत केळी मॅश करा. आता त्यात ३ चमचे दही मिक्स करा. शेवटी अर्धा चमचा हळद मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि १५ मिनिटे राहू द्या. नंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.