esakal | तुमच्या बॅगेत ठेवा नेहमी 'हे' 10 मेकअप प्रोडक्ट
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्या बॅगेत ठेवा नेहमी 'हे' 10 मेकअप प्रोडक्ट

तुमच्या बॅगेत ठेवा नेहमी 'हे' 10 मेकअप प्रोडक्ट

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मेकअप साधा असो की पार्टीवेअर तो व्यवस्थितच असायला लागतो. कधीकधी मेकअप झाल्यानंतर काही तासातच चेहऱ्यावर पांढरेपट्टे दिसायला लागतात अशावेळी तुमच्याकडे काही सेट सोबत असणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यावेळी तुम्हाला परत मेकअप सेट करण्यास मदत होईल. तसेच अगदीच तुम्हाला मेकअप विषयी काही ही माहित नाही आत्ताच सुरुवात करणार असाल तर हे दहा मेकअप कीट नेहमी आपल्या पर्समध्ये ठेवा. आपण जसे पाणी, मेडीसीन सोबत ठेवतो तसे हे प्रोडक्ट देखील सोबत असायला हवेत.

फाउंडेशन (Foundation)

तुमच्या बॅगेत नेहमी फाउंडेशन असायलाच हवे. आॅल कंल्ट्रोल असो की कोणतेही असो. आपल्या स्किन टोन नुसार तुम्ही वापरू शकता. याचे फक्त दोन पॅच घेऊन तुम्ही स्पंज ने लावू शकता. हे लावत असताना कान, नाक, गळ्याला लावून घ्या. डार्क सर्कल असेल तर Concealer लावू शकता.

Concealer: कंसीलर हे चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी असते. याचे टेक्सचर वेगवेगळे असते. तुमच्या चेहऱ्यावर जर डाग असतील तरच याचा वापर करा.

Loose Setting Powder : लुज पावडर ही फाउंडेशनसारखी काम करते. हेवी मेकअपची गरज नसेल तर फाउंडेश नंतर कॉम्पॅक्ट पावडर लावू नका.

Bronzing Powder : चेहऱ्यावरती काही ठिकाणी पांढरट काही ठिकाणी काळपट दिसत असेल तर या पावडरीचा वापर करतात. जसे की कानाजवळ, कपाळाजवळ वापरू शकता.

Eyebrow Pencil: मेकअप झाल्यानंतर लुक येतो तो आपल्या आयब्रो नेच. यासाठी ही पेन्सिल ही नेहमी क्रिमी असावी. शक्यतो त्याचा शेड हा चाॅकलेटी असावा.

Eye Shadow : संपूर्ण मेकअप जरी झाला तर ही डोळ्यांचा मेकअप हा खूप महत्वाचा आहे. यासाठी आयशॅडो पॅलेटमध्ये असलेले कलर वापरु शकता. किंवा एकादा आयशॅडो कलर वापरू शकता.

Mascara : डोळे मोठे दिसण्यासाठी मस्करा गरजेचा असतो. यासाठी वाॅटर फ्रुफ मस्करा वापरु शकता.

Lipstick : महिलांसाठी तर ही गरजेची गोष्ट असतेच पण यासाठी लाॅग लास्टिंग लिपस्टिकचा वापर करा.

makeup remover: मेकअप उतरवण्यासाठी makeup remover सोबत ठेवा. याचबरोबर नेहमी फेश वाॅश ही ठेवा.

Nude Lipstick : तुम्ही जेव्हा डार्क काजळ,हेवी आयशॅडो लावता अशावेळी याचा वापर करा. तुम्ही स्किनटोनप्रमाणे याचा वापर करू शकता. मात्र कोणतेही प्रोडक्ट युज करताना कानाच्या मागच्या बाजूला ट्राय करा. तसेच मेकअप करण्याआधी मॉइश्चराइझर क्रिम चा वापर करा.

डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारीत आहे. कोणतेही प्रोडक्ट खरेदी करताना तज्ञांचा सल्ला घ्या.

loading image
go to top