Diet Tips : आता तूम्ही डायटींगमध्येही चहा घेऊ शकता? कसे ते पहा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diet Tips

Diet Tips : आता तूम्ही डायटींगमध्येही चहा घेऊ शकता? कसे ते पहा!

वजन कमी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. म्हणून तर डायट करणं हे भल्याभल्यांना जमत नाही. मनावर ताबा असेल तरच आहारतज्ञ डायट फॉलो करा असे सांगतात. अन्यथा जमेल तसं करा असे म्हणतात.

बऱ्याचदा लोक सगळ्या गोष्टींचा त्याग करू शकतात. पण चहावर पाणी सोडणं अशक्य आहे. सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पिलं, किंवा डायटचा नाश्ता केला तरी इतरांच्या चहाच्या त्या रसाळ कपाकडे बघून डायट करणाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं.

अनेक लोकांसाठी 'चहा' म्हणजे सर्वस्व असू शकते. आपल्या देशात चहा प्रेमी कमी नाहीत. काही लोक चहा पिण्याचे निमित्त शोधत असतात. त्यामूळे डायचवर असताना चहा कसा बनवायचा, किती वेळा प्यायचा सर्व काही जाणून घेऊयात.

दुधाच्या चहामध्ये जास्त कॅलरीज असतात. जर तुम्ही दिवसातून 2-3 वेळा चहा पिलात. तर ते तुमच्या कॅलरीजचे प्रमाण वाढवू शकते. चहासोबत तळलेले स्नॅक्स खाल्ल्याने वजन वाढते. दुधासोबत एक कप चहा प्यायल्याने तुमच्या वजनावर फारसा परिणाम होणार नाही. जर तुम्हाला चहासोबत काही खायचे असेल तर बिस्कीट, ब्रेड बटर याऐवजी खाखरा, मखणा, चुरमूरे किंवा फुटाणे तूम्ही खाऊ शकता.

चहा कसा बनवाल

- ज्या चहात साखर नसेल असा चहा बनवा. चहामध्ये गोडपणासाठी नैसर्गिक स्वीटनर किंवा थोडा किंवा गूळ घाला.

- साय नसलेल्या दुधापासून चहा बनवा. दूध आणि पाणी यांचे प्रमाण समान ठेवा. चहामध्ये लवंग-वेलची आणि आले घाला.

- चहा रिकाम्या पोटी पिऊ नका.तसेच नाश्ता करताना चहा पिण्याची सवय असेल तर ते बंद करा. नाश्त्याच्या एक तास आधी किंवा नंतरच चहा घ्या.