हॅप्पी पेरेंटिग : वीकएण्डचा फंडा

सध्याचे नोकरदार आई-बाबा सोमवार ते शुक्रवार दिवसरात्र काम करताना कधी एकदा वीकएण्ड येतोय याची वाट पाहत असतात!
Weekend Funda
Weekend FundaSakal
Summary

सध्याचे नोकरदार आई-बाबा सोमवार ते शुक्रवार दिवसरात्र काम करताना कधी एकदा वीकएण्ड येतोय याची वाट पाहत असतात!

सध्याचे नोकरदार आई-बाबा सोमवार ते शुक्रवार दिवसरात्र काम करताना कधी एकदा वीकएण्ड येतोय याची वाट पाहत असतात! काहींचा वीकएण्ड शुक्रवारी रात्रीच ‘खास’ पार्ट्यांनी सुरू होतो, तर काहीजण कुठला तरी रिसॉर्ट निवडतात. ‘रिलॅक्स’ होणे हा एककलमी कार्यक्रम असल्यामुळे मुलांची रवानगी आजी-आजोबांकडे केली जाते. सगळेच पालक असे असतात असे नाही. बऱ्याच जणांचा ‘वीकएण्डे’ हा मुलांना ‘क्वालिटी टाइम’ देण्यासाठी राखून ठेवलेला असतो. बिचारी मुलेसुद्धा या वीकएंडची आतुरतेने वाट पाहत असतात.

सुरुवात एफसी रोड किंवा एमजी रोडवर रांगा लावून ब्रेकफास्ट करण्याने होते. घरी आल्यावर सामूहिकपणे; पण प्रत्येकाकडून वेगवेगळ्या मोबाईलवर टाइमपास केला जातो. त्यानंतर कुठल्या मॉलमध्ये जायचे याची चर्चा होते. मॉलमधील ‘झोन’मध्ये मुलांना खेळायला सोडले जाते. छोट्यामोठ्या राईड्स मुले ‘एंजॉय’ करतात. मस्त एसीमध्ये शॉपिंग होते, एखादे चकाचक खेळणे विकत घेतले जाते. तिथेच फास्टफूड खाऊन पोट भरते. अर्थातच या सगळ्या ‘इव्हेंट्स’चे सेल्फी काढले जातात. त्यानंतर संध्याकाळी छोटी मुले ‘बागेत’ जातात आणि मुले मोठी असतील, तर मल्टिप्लेक्सचा रस्ता धरला जातो. अशा रीतीने मुलांना ‘क्वालिटी टाइम’ दिला जातो.

खरेच मुलांना सुट्टीच्या दिवशी आई-वडिलांकडून काय हवे असते?

१. मुलांना आई-वडिलांशी भरपूर खेळायचे असते.

२. मुलांना निवांत झोपायचे असते आणि मग आईच्या कुशीत नखरे करत उठायचे असते!

३. मुलांना आई-वडिलांशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या असतात.

४. विशेषतः लहान मुलांना आई-बाबांच्या कडेवरून नवनवीन जग बघायचे असते.

थोडक्यात, मुलांना आपल्याकडून फक्त ‘वेळ’ आणि ‘प्रेम’ हवे असते. आपण मात्र फक्त चंगळवादी पर्याय उभे करतो आणि त्यालाच ‘आनंद’ मानतो.

आजपासून वीकएंडला जरा वेगळा विचार करूयात.

१. जरा निवांत जगूया. घड्याळाला सुट्टी देऊ. मोबाईलला ‘स्लीप’ मोडमध्ये ठेवूयात.

२. मुलांना काहीतरी नवीन अनुभव मिळेल यांचा प्रयत्न करूयात.

३. आजूबाजूचा निसर्ग-इतिहास-भूगोल जाणून घेऊयात.

४. घरी मुलांबरोबर धमाल करत बनवलेली साधी ‘भेळ’सुद्धा पक्वान्न बनू शकते.

५. एखाद्या तरी मित्राकडे/नातेवाइकांकडे जाऊयात. त्यांना आपल्याकडे बोलवूयात.

करून तर बघा! येणारा सोमवार एकदम ताजातवाना बनेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com