Sleeping Tips | रात्री शांत झोप हवी असेल तर या गोष्टी नक्की खा eat these food for good sleep | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sleeping

Sleeping Tips : रात्री शांत झोप हवी असेल तर या गोष्टी नक्की खा

मुंबई : प्रत्येकाला शांत झोप मिळणे आवश्यक आहे. पुरेशी झोप मिळाली नाही तर अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात.

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे रात्री वेळेत झोपणे होत नाही आणि सकाळी लवकर उठावे लागते. अशा वेळी झोप अपूर्ण राहाते. जेवढा वेळ झोप मिळते त्यातही अनेकदा जाग येत राहाते.

सुट्टीच्या दिवशी झोप पूर्ण करावी म्हटलं तर तेही शक्य होत नाही. या निद्रानाशाच्या समस्येवर उपाय म्हणून आपल्या जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे. (eat these food for good sleep ) हेही वाचा - नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

मेलोटोनिन वाढवा -

चांगल्या झोपेसाठी मेलोटोनिन आवश्यक असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी अशा गोष्टी खा ज्यामुळे मेलोटोनिन वाढवण्यास मदत होईल. पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम असलेल्या पदार्थांचे सेवन करा. यामुळे चांगली झोप लागते.

झोपण्यापूर्वी केळे, अक्रोड, बदाम आणि दुधाचे सेवन करा. कॅल्शिअममुळे स्नायूंना आराम मिळतो. यामुळे ट्रेप्टोफॅन हार्मानचे रुपांतर मेलोटोनिनमध्ये होते.

रात्री झोपेतून उठून खाणे टाळा -

काही जणांना रात्री झोपेतून उठून काहीतरी खाण्याची सवय असते. यामुळे झोपेत व्यत्यय येतो व खाऊन लगेच झोपल्यामुळे वजनही वाढते.

दूध प्या -

ट्रेप्टोफॅन आणि मेलोटोनिन दुधातून मिळतात ज्यामुळे झोप येण्यास मदत होते. सेरोटोनिन हार्मोन मूड सुधारतो आणि झोप वाढवतो. तसेच या हार्मोनमुळे मेलोटोनिनला संश्लेषणात मदत होते. दूध प्यायल्यामुळे मेलोटोनिन स्रवते.

संध्याकाळी चहाऐवजी हे खा -

सुका मेवा खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या दूर होतात. तसेच सुका मेवा खाल्ल्याने मेलोटोनिन मिळते. यामुळे झोप चांगली येते. चहा-कॉफीतील कॅफेनमुळे तुम्ही सक्रिय राहाता आणि झोप उडते.

गॅजेट्सपासून दूर राहा -

गॅजेट्सच्या तीव्र प्रकाशामुळे मेलोटोनिन स्रवण्यात अडथळा येतो. त्यामुळे झोप येत नाही. झोपण्यापूर्वी एक तास गॅजेट्सपासून दूर राहा.