चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अंड्याचाही होतो वापर ; अशा आहेत स्टेप्स

egg face pack for skin easy homemade face pack in kolhapur
egg face pack for skin easy homemade face pack in kolhapur

कोल्हापूर : प्रोटीन आणि पोषक तत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे तब्येतीसाठी अंडी चांगली असतात. म्हणून रोज अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. आपल्याला माहीत आहे की अंडी केसांसाठी चांगली असतात. केसांना चमक येण्यासाठी अंडी लावली जातात. पण तुम्हाला सांगितले की, चेहऱ्याला अंडी लावल्याने चेहराचे सौंदर्य वाढवण्यास मदत होते. तुम्हाला वाटेल की काय सांगत आहात. चेहऱ्याला अंडी कशी काय लावली जाऊ शकतात. पण हे बरोबर आहे. अंड्यामध्ये बरेच असे प्रोटीन तत्व आहेत. जर अंड्यांचा फेसमास्कचा वापर केला तर चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो पाहायला मिळेल. त्याशिवाय चेहऱ्यावरील पुरळ, डाग, काळपट त्वचा दूर होते. आम्ही तुम्हाला आज चेहऱ्याला अंडी कशी लावली याची योग्य पद्धत सांगणार आहे. पुढच्या वेळेस केसांना अंडी लावताना त्यात थोडेसे शिल्लक ठेऊन चेहऱ्याचा फेसपॅक बनवून चेहऱ्याला ही लावा.

अंड्यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल, प्रोटीन, फैसरीक असिड असते. जे त्वचेला तयार करण्यास मदत करते. त्वचेला लावल्याने पोर्स खुले होतात आणि त्वचाही उजळते.अंडे चेहऱ्यावर लावल्याने आपल्याला आवडत नसलेलं चेहऱ्यावरील लव हटवण्यास मदत करते. अंड्यांचा पांढरा भाग चेहऱ्याला टाईट आणि टोन करण्यास मदत करतो. अंड्यांच्या पांढऱ्या भागामध्ये अल्ब्यूमिन नावाचे प्रोटीन असतात. ज्यामुळे त्वचेवर चमक येते.

फेस पॅक

साहित्य

  • अंड्याचा पांढरा भाग.

फेस पॅक लावण्याची पद्धत

1. जर तुम्हाला चेहऱ्यावरील लव कायमचे हटवायचे असतील तर ते अंड्यांचा पांढरा भाग मदत करतो.

2. एका वाटीमध्ये अंड्यांचा पांढरा भाग घेऊन ते चांगले फेटून घ्या.

3.त्यानंतर ब्रशच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्याला लावून घ्या.

4.आता एक टीशू पेपरचा तुकडा चेहऱ्यावर लावा.

5.जेव्हा ते पूर्ण पणे सुखेल तेव्हा ते हळू हळू चेहऱ्यावरून काढा.

चेहऱ्यावरील पुरळ दूर करण्यासाठी फेसपॅक

जर तुम्हाला तुमच्या वयापेक्षा कमी दिसायचे असेल तर अँटी एजिंग फेसपॅक यावर सर्वात चांगला उपाय आहे.

साहित्य

  • तांदळाचे पीठ 2 चमचे
  • बदामाची पावडर 1 चमचा
  • 1 अंडे
  • लिंबाचा रस काही थेंब.

फेसपॅक बनवण्याची आणि लावण्याची पद्धत :

1. फेसपॅक बनवण्यासाठी 1 चमचा तांदळाचे पीठ, बदाम पावडर, अंडे, लिंबाचा रस, एकत्र करून फेसपॅक बनवावा.

2.याला चेहऱ्यावर लावून काही वेळ तसेच ठेवावे.

3.जेव्हा ते चांगले सुखेल तेव्हा ते धुवून घ्या.

4.नियमीत ते लावल्याने चेहऱ्यामधे तुम्हाला फरक जाणवेल . 

चेहऱ्यावरील पोर्स टाईट करण्यासाठी अंड्याचा फेसपॅक

अंडी चेहऱ्यावरील वाढलेले खुले पोर्से बंद करण्यासाठी खूप मदत करते.

साहित्य

  • अंड्यांचा पांढरा भाग 1 चमचा.
  • लिंबाचा रस

पॅक बनवण्याची आणि लावण्याची पद्धत :

1.हे बनवण्यासाठी एका वाटी मध्ये अंड्याचा पांढरा भाग घ्या.

2.ह्यामध्ये लिंबाचा रस घाला.

3.हे चेहऱ्यावर पंधरा मिनिटे लावून ठेवा.

4.आठवड्यातून दोन वेळा लावल्यास तुम्हाला चेहऱ्यामध्ये फरक जाणवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com