पंखा-कुलरचा वेग वाढला तरी वीजबिल मात्र येईल कमी; फॉलो करा या ट्रिक्स

उन्हाळ्याचा हंगाम सुरु झाला आहे आणि उष्णतेवर मात करण्यासाठी अनेकांनी कुलर आणि एसी वापरायला सुरवात केलीही असेल.
Electricity Bill Reduce Trick
Electricity Bill Reduce Trickesakal
Summary

उन्हाळ्याचा हंगाम सुरु झाला आहे आणि उष्णतेवर मात करण्यासाठी अनेकांनी कुलर आणि एसी वापरायला सुरवात केलीही असेल.

उन्हाळ्याचा हंगाम सुरु झाला आहे आणि उष्णतेवर मात करण्यासाठी अनेकांनी कुलर आणि एसी वापरायला सुरवात केलीही असेल. ज्या थंडीत पंखे चालू नव्हते, आता तेही फुल्ल ऑनवर सुरु आहेत. पण भरपूर व्होल्टेज असूनही व्यवस्थित हवा मिळत नाही, हे उन्हाळ्याच्या सुरुवातीला सर्रास दिसून येतं. जर तुम्हालाही असे वाटत असेल की आपला पंखा कमी हवा देत आहे आणि विजेचे युनिट्स तितकेच खर्च करीत आहेत तर पंख्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपण एसी दुरुस्त करतो, पण कुलर आणि पंखांकडे लक्ष देत नाही. चला तर मग अशा काही ट्रिक्स जाणून घेऊयात, ज्यामुळे एका मिनिटात पंखा आणि कुलरचा स्पीड वाढेल आणि वीजबिलही (Electricity Bill) कमी होईल.

Electricity Bill Reduce Trick
पंखा, फ्रीज, गॅस बर्नर खराब झालाय? लॉकडाऊनमध्ये घरबसल्या 'अशी' करा होम अप्लायन्सची दुरुस्ती!

अनेक महिन्यांनी पंखा सुरु केल्यानंतर तो व्यवस्थित हवा देत नाही, असे वाटत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला इलेक्ट्रिशियनला बोलवण्याची किंवा नवीन पंखा आणण्याची गरज नाहीयेय. तुम्हाला फक्त थोडेसे काम करावे लागेल ज्यामुळे फॅनचा वेग वाढेल. इतकंच नाही तर जसजसा वेग वाढेल, तसतसं वीजबिलही कमी होईल.कोणताही पंखा कमी दाबाने हवा देतो. खालच्या दिशेने हवा पसरवतो. याच कारणामुळे पंख्याचे ब्लेड समोरच्या बाजूने झुकलेले वक्राकार असते.

पंख्याच्या ब्लेडमध्ये धूळ जमा होते

तज्ज्ञांच्या मते पंख्याच्या ब्लेडमुळे हवा कापली जाते आणि त्यामुळे धुळीचे-मातीचे कण ब्लेडच्या उघड्या भागात जमा होतात, ज्यामुळे पंखा जास्त भार घेऊ लागतो. वेग मंदावतो आणि पंख्याची मोटार अधिक भार घेऊ लागते, त्यामुळे विजेचे बिल जास्त येते. मग तो सिलिंग फॅन असो, टेबल फॅन असो, कुलर असो किंवा एसी असो. हे तत्त्व सर्वांनाच लागू पडते.

Electricity Bill Reduce Trick
उन्हाळ्यासाठी कुलर, फ्रीज व एसीला वाढतेय मागणी

ओल्या नॅपकीनने स्वच्छ करा फॅनचे ब्लेड

पंख्याचा वेग वाढवण्यासाठी इलेक्ट्रिशियनला बोलावण्याची गरज नाही. तुम्ही ते स्वत:च दुरुस्त करू शकता. आपल्याला फक्त ओल्या कपड्याने फॅनचे ब्लेड साफ करावे लागेल. परंतु हे लक्षात ठेवा की ब्लेड जास्त ताकदीने साफ करू नका, कारण यामुळे अलाइनमेंट खराब होऊ शकते. ब्लेड हळूहळू काळजीपूर्वक स्वच्छ करा. पंखा साफ केल्यानंतर नजर टाकली तर पंखा वेगाने धावू लागेल.त्याचबरोबर त्याचा आवाजही कमी असेल. यामुळे पंख्याच्या मोटरचा भार कमी लागणार असून वीज बिलावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com