वंशाचा दिवा

वंशाचा दिवा

Summary

आज मुलींनी त्रिताल आपल्या कर्तृत्वाने कवेत घेतलेले आहे. तरी आजही कित्येक कुटुंबात वंशाचा दिवा हवाच ही मानसिकता आहे.

- नामदेव राठोड

जन्मदात्री वंशवेल वाढविण्याच्या नादात हकनाक बळी पडत आली आहे. तिचे सोयरसुतक आधीही कुणाला नव्हते, आजही नाही. फक्त वंशाचा दिवा तेवत ठेवायला एक मुलगा तरी हवाच हाच अट्टहास. पण आज काय परिस्थिती आहे. समाजात काय मानसिकता आहे सुशिक्षित म्हणून ढोल पिटणाऱ्या पांढरपेशा समाजाची. आज मुलींनी त्रिताल आपल्या कर्तृत्वाने कवेत घेतलेले आहे. तरी आजही कित्येक कुटुंबात वंशाचा दिवा हवाच ही मानसिकता आहे.

वंशाचा दिवा
Relationship Tips : गर्लफ्रेंड पटवायचीय? मग आजच सोडा चार वाईट सवयी

साधारणतः ऐंशीच्या दशकात ग्रामीण भागात सासरकडील किंबहुना नणंदा, जावा या सर्व मंडळींनी मुलगा व्हायला हवा होता. पण मुलगीच जन्माला घातली. त्यामुळे अतोनात छळ केलेले सतत ऐकिवात असे. कारण घराला घरपण फक्त मुलगाच देऊ शकतो, मुली परक्याचे धन असते, अशी धारणा यास कारणीभूत असायला पाहिजे. लिंगभेदही जास्त प्रमाणात पाळल्या जात असेल. त्यावेळी कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहात स्वातंत्र्यानंतरची पहिली अथवा दुसरी पिढी आली असेल असे गृहीत धरल्यास त्याकाळात असलेल्या रूढी परंपरा कारणीभूत असतील असे समजू.

वंशाचा दिवा
मोदी जॅकेटनंतर आता सोलापुरी चादर जॅकेटची क्रेझ !

पहिली मुलगी झाली तर दुसरा मुलगा झालाच पाहिजे असा घरच्या मंडळींचा अट्टहास असायचा. एकामागे एक दोन चार मुली जन्माला आल्या तर त्या मातेला समाज आणि कुटुंब जगणे कठीण करून टाकायचे. वारंवार टोमणे, कुत्सितपणे बोलणे तिला ऐकावे लागत. अनेकांनी मुलांची वाट पाहत नऊ नऊ मुलींना जन्म दिला आहे. आरोग्याच्या कुठल्याही आधुनिक सोयी सुविधा ग्रामीण भागात तेव्हा पोहोचलेल्या नव्हत्या. घरीच बाळंतपण केली जायची. कधी कधी बाळ जन्मास घालायच्या वेळी कित्येक माता दगावण्याच्या घटना घडायच्या.

वंशाचा दिवा
लग्नाचं नातं रक्ताचं नसलं, तरी 'आयुष्यभर' टिकतं; पण..

समजा पहिली मुलगी झाली तर दुसऱ्या वेळी मुलगाच हवा यासाठी नवस सायास करणारे, ज्यांच्या कडे बक्कळ पैसा आहे. त्यांनी गैर मार्गाने गर्भलिंग निदान करणे अशा बऱ्याच वाईट कुप्रथा आजही अस्तिवात आहेच की ज्याला आपण अशिक्षित म्हणतो, मागासलेले खेडपट म्हणतो, ती मंडळी मुलगा असो वा मुलगी असा भेद करताना दिसत नाही. याउलट जे उच्चशिक्षित आहेत त्यातले काही महाभाग दोन मुलीच झाल्या म्हणून तिसऱ्या वेळी चान्स घेऊच येणं एक प्रकारे कुठल्याही मार्गाने मुलगा झालाच पाहिजे.

वंशाचा दिवा
लग्नानंतर वर्जिन राहण्यासाठी मुली उचलतायेत धोकादायक पाऊल

आपण गेल्यावर संपत्ती कुणाला द्यायची असा मागास विचार करताना दिसतात. प्रश्न पडतो खरा सुशिक्षित कोण? जो मुलगा किंवा मुलगी हा भेद न करता जे जन्मास आले, त्याचा मोठ्या मनाने स्वीकार करणारा गरीब अशिक्षित की मुलांचा अट्टहास धरणारे आणि त्यासाठी वाटेल ते करणारे, भ्रूण हत्या करणारे काही महाभाग. आज स्त्री-पुरुष जन्मदर दिवसेंदिवस घसरत जात आहे. हे समीकरण जर बिघडले तर सामाजिक स्वास्थ्य बिघडेल. त्याचे भयावह परिणाम येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागतील याची सुद्धा जाणीव अजून समाजाला झालेली दिसत नाही. ही खऱ्या एकविसाव्या शतकातील समाजाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. म्हणून आता तरी जागे झाले पाहिजे. स्त्रीभ्रूण हत्या करू नका. तिला जगात येऊन मोकळा श्वास घेऊ द्या. मुलांपेक्षा मुली सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी बजावताना दिसत आहेत.

कन्येविना कुठे। शोभेल रे घर।

तुझी जन्मभर।साथ देई।

करू नको भेद। मुलगा मुलगी।

ठेवते सलगी। मुलगीच।

- रामटेक नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com