बॉयफ्रेंडचा खरा चेहरा ओळखायचा असल्यास वापरा 5 टिप्स

exact the mind of your boyfriend identify with the help tips
exact the mind of your boyfriend identify with the help tips

कोल्हापूर : आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे लोक असतात जे पहिल्याच नजरेत तुमच्यासाठी तुम्हाला योग्य वाटतात. परंतु त्यांच्या त्या चेहऱ्या पाठीमागे चुकीच्या गोष्टी, चुकीचे चेहरे लपलेले असतात. अशी व्यक्ती तुमचा बॉयफ्रेंड असेल तर ही सर्वात वाईट गोष्ट आहे. बऱ्याच वेळा तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा मित्रांमध्ये बॉयफ्रेंड स्वतःचा खराखुरा चेहरा दाखवतो. काहीवेळा दुसरे लोक त्याचं कौतुक करतात त्यावेळी तुम्ही पुन्हा कन्फ्युजनमध्ये पडता. अशा व्यक्तीला हँडल करणे डोक्याला त्रास होऊन बसतं. यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो. ज्याचा गैरफायदा घेणे त्याला माहित असते. जर तुम्ही तुमच्या पार्टनरच्या अशा वागण्याला घेऊन टेन्शनमध्ये असाल तर या पाच गोष्टी नक्की वाचा, ज्या तुमच्या पार्टनरचा खराखुरा चेहरा समोर आणण्यासाठी उपयोगी पडतील. 

तो नेहमी म्हणत असेल की तू वेडी आहेस

पहिल्यांदा तुम्ही चुकून जरी प्रेमाने तू पागल आहे, किंवा वेडी आहे असं म्हंटलं तर हे छान वाटतं. परंतु हेच वाक्य कुणी सातत्याने म्हणत असेल तर तुमचा बॉयफ्रेंड तुम्हाला मूर्ख बनवण्याचा कोणताही चान्स सोडत नाही हे लक्षात घ्या. प्रत्येक वेळी तो तुमच्या समजूदारीवर आणि बुद्धीवर प्रश्न उपस्थित करत असतो. हे सिद्ध करत असतो तो किती हुशार आहे. त्याने तुमच्या आयुष्याला खूप सुंदर बनवल आहे. जर असं असेल तर या क्युटनेक गोळीला तुम्ही बंदुकीच्या गोळी आहे असं समजून घ्या.

क्षणात तोलतो, क्षणात मोडतो असं होत असेल तर

त्याचा व्यवहार जास्त प्रमाणात अनप्रेडिक्टेबल असेल. जर तो काही वेळात खूश होत असेल. तुमच्यावर प्रेम करत असेल तर तुम्ही स्वतःला जगातले सगळ्यात भाग्यशाली मुलगी समजत असता. जेव्हा तुम्ही या स्वप्नात जगत असता, तेव्हा तो तुम्हाला एखादी वेगळ्या गोष्टीची आठवण करून देत असतो. तुम्हाला कमीपणा दाखवणे, भांडणे असे प्रकार करत असेल. वेगळे शब्द वापरत असेल तर थोडं जपून रहा. अशावेळी तुम्हाला त्याचे नरम-गरम व्यवहार तुम्हाला समजून येत नसतात. फक्त तुम्हाला तुमच्या चुका लक्षात येतात. म्हणून तो तुमच्याशी खूप प्रेमाने वागत आहे असे तुम्हाला वाटत असते. परंतु सावध राहा, असं प्रेम लवकरच भारी पडणार आहे.

जो तो म्हणेल तेच सही

'खाता न बही' अशी एक हिंदीमध्ये म्हण आहे. ही त्या लोकांसाठी उपयोगी पडते जे त्यांचे डील कधीच फिक्स करत नसतात. त्यांनी दिलेल्या वचनाला शब्दाला काही किंमत नसते. ते आज म्हटंले की सूर्य पूर्वेला निघतो, तरी या गोष्टीवरून इतका वाद करतील की, उद्या म्हणतील सूर्य पश्चिमेला उगवतो आहे. तुमचा बॉयफ्रेंड त्याच्या सवयीनुसार स्वतःच्या गोष्टी बदलत असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका. शब्दाला महत्त्व असले पाहिजे. तो असा प्रकारचा व्यवहार तुमचा बॉयफ्रेंड करत असेल तर तो मेंटेली अलस्टेबल असल्याची खात्री करून देत असतो. तो त्याच्या खऱ्याखुऱ्या चेहरा समोर येऊ देत नाही. 

जर तो म्हणत असेल की हे मी केले का?

तू खूपच कुल आहेस. कोणत्या गोष्टीवर मोठ्याने बोलत नाही. परंतु शांतपणे प्रत्येक बिघडणाऱ्या गोष्टीला तुम्हाला जबाबदार असल्याची जाणीन करुन देत असेल. तुम्ही न केलेल्या गोष्टींना तुम्हाला जबाबदार ठरवत असेल, त्याच्या चुकीचे खापर तो तुमच्या माथी सहजपणे फोडत असेल तर, अगदी नाटकीय वातावरणात काही गोष्टींची जबाबदारी घेत जेणेकरून तुम्हाला बरं वाटावं आणि तुम्ही म्हणता की यामध्ये तुझी काहीच चुक नाही. अशावेळी तुम्ही काही गोष्टी समजून घेत नंतर विचार करत असाल, की खरचं माझी चूक होती का? पण आम्ही म्हणतो अजिबात नाही. यावेळी समजून जा की, फक्त तुम्ही भावनिकतेचा शिकार झालेले आहात.

तुमचा प्रत्येक निर्णयावर प्रश्न उपस्थित करत असेल 

जेव्हा तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेत असता. तेव्हा एखाद्या गोष्टीवर विचार करत असतो की आपली तर चुक नाही. परंतु अशावेळी सपोर्ट करणारा पार्टनर, सकारात्मक गोष्टी सांगून हे दाखवून देत असेल की तोच बरोबर आहे. परंतु स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती तिला असं वाटत राहत की, त्याच्या इनपुटविना तुम्ही कोणतेही काम करु शकतं नाही. कोणत्याही गोष्टीचे श्रेय तुम्हाला मिळत असेल तर त्या गोष्टीत काहीतरी खोट तो काढणार किंवा तुमच्या निर्णयावर ते प्रश्नचिन्ह उपस्थित करणार. तसेच तुमचे काही नकारात्मक फोटो काढून तुमचा आत्मविश्वास कमी करण्यासाठीही प्रयत्न करत असतो.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com