Facial Fat Reducing : चेहऱ्यावर फॅट वाढलयं ; 'या' टिप्स करा फाॅलो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Facial Fat Reducing

Facial Fat Reducing : चेहऱ्यावर फॅट वाढलयं ; 'या' टिप्स करा फाॅलो

फॅट फक्त बाॅडीतच असते असे नाही तर चेहऱ्यावर देखील साठते. चेहऱ्यावरील फॅटमुळे गाल मोठे दिसतात. चेहऱ्याची सुंदरता कमी होती. यामुळे वय जादा दिसू लागते. यासाठी तासनंतास व्यायाम करावा लागतो. तेव्हा हळूहळू फॅट कमी होण्य़ास सुरुवात होते. यासाठी तुम्ही नियमित दिनचर्यत काही बदल केले तर नक्कीच फरक जाणवेल. यासाठी या टिप्स करा फाॅलो.

फेशिअल एक्सरसाइज करा

चेहऱ्यावरील फॅट कमी करण्यासाठी लिप पुलअप, चिन लिफ्ट, फिश लिप, नेक कर्ल अप आणि एअर ब्लोइंग एक्सरसाइज करू शकता. या एक्सरसाइजच्या मदतीने काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल.

पाण्य़ाचा वापर भरपूर करा

दररोज किमान तीन लिटर पाणी पिले पाहिजे. यामुळे शरीरातील अतिरिक्त घाण बाहेर फेकली जाते. पाण्याचा वापर जादा केल्याने मेटाबाॅलिझम बूस्ट होते आणि चरबी कमी होण्यास मदत होते.

मीठ कमी खावा

तुम्हाला जर चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर मिठाचा वापर कमी करा. मिठात असणाऱ्या सोडियममुळे शरीरात पाणी साठू लागते. ज्यामुळे शरीर डिटाॅक्स होण्य़ास अडचण येते. यामुळे चेहऱ्यावर फॅट वाढते.

बेकरी प्रोडक्ट टाळा

चेहऱ्यावरील फॅट कमी करण्य़ासाठी ब्रेड, पास्ता, मिठाई खाणे टाळा. यामुळे फॅट वाढण्यास सुरुवात होते.

झोप गरजेची

झोप पुर्ण न झाल्याने देखील शरीरात फॅट वाढत राहते. चेहऱ्यावरील फॅट कमी होण्य़ासाठी झोप गरजेची असते. झोप पूर्ण न झाल्याने शरीरीतील स्ट्रेस लेवल वाढते. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन प्रभावित होते. कमीतकमी ६ ते ८ तास झोप गरजेची आहे.

loading image
go to top