‘पालन’गोष्टी : ‘मिरर इमेज’

‘पाहिलंस का, आपला अनि कसा मुर्खासारखा वागला. त्याला अक्कल म्हणून नाही.’ बाबा वैतागून बोलत होते. ‘अहो पण, त्यानं केलं तरी काय?’ ‘त्यानं काकांना सरबत दिलं नाही.
Mirror Image
Mirror ImageSakal
Summary

‘पाहिलंस का, आपला अनि कसा मुर्खासारखा वागला. त्याला अक्कल म्हणून नाही.’ बाबा वैतागून बोलत होते. ‘अहो पण, त्यानं केलं तरी काय?’ ‘त्यानं काकांना सरबत दिलं नाही.

- फारूक काझी, बालमानसविषयक साहित्यिक

प्रसंग १

‘पाहिलंस का, आपला अनि कसा मुर्खासारखा वागला. त्याला अक्कल म्हणून नाही.’ बाबा वैतागून बोलत होते. ‘अहो पण, त्यानं केलं तरी काय?’ ‘त्यानं काकांना सरबत दिलं नाही. आपल्या मित्रासाठी घेऊन गेला. सगळे लोक काय विचार करतील. यांनी मुलाला काही संस्कार शिकवले आहेत के नाहीत?’

‘अहो, काकांना सरबत दिलं होतं त्यानं. काका नको म्हणाले. म्हणून त्यानं तो ग्लास त्याच्या मित्राला दिला.’ ‘खरं?’ ‘हो.’

प्रसंग २

सरांनी वर्गात कपिलला उभं केलं. ‘मोठा झालास तशी तुला शिंगं फुटू लागलीत.’

‘मी..मी काय केलं सर?’ ‘मी मघापासून तुला उभं रहायला सांगतोय. आणि तू उभा राहिला नाहीस.’

‘उभा होतो सर. तुम्हीच बस म्हणालात.’ मुलांनी दुजोरा दिला.

घडलं काही वेगळं आणि आपण समजलो काही वेगळंच. कळत नकळत बरेचदा असं होत राहतं. वरील दोन्ही प्रसंग, ठिकाणं भिन्न असली, तरी आपण प्रसंगांवरून मात्र एकसारखाच अंदाज बांधतो. चुकीचा. घडलंय काय, आपण नेमका कोणता अंदाज करतोय, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. मोठ्या व्यक्तींनाही हा अनुभव आपल्या कार्यस्थळी येत असतो.

‘मिरर इमेज’ म्हणजे ‘आरशातील प्रतिमा.’ आपण एखादा शब्द आरशात पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं, की तो उलट क्रमानं दिसतोय. शब्द तोच असतो; पण आरशात तो उलट क्रमानं दिसतो. बरीच मुलं लिहिताना शब्द उलट क्रमानं लिहितात. म्हणजे ‘सुरज’ हा शब्द ते ‘जरसु’ असा लिहितात. याचा अर्थ त्या मुलांनी चुकीचं लिहिलंय असा होत नाही. फक्त तो शब्द उलट क्रमानं लिहिला गेलेला असतो. मुलांच्या लेखनात आढळणारी ही एक अडचण आहे. चूक नव्हे. ती अडचण प्रयत्नांनी दूर करता येते. शिक्षणशास्त्रात यावर बरीच संशोधनं झालेली आहेत.

आपल्या व्यवहारात आपण काही घटना, काही प्रसंगांकडे खासकरून मुलांच्या बाबतीतल्या, मिरर इमेजच्या अंगानं बघत असतो आणि अपसमज निर्माण होतात. कृती ओग्य असते. फक्त आपण ती समजून घेताना उलट क्रमानं घेतो आणि नको ते गैरसमज होतात. त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर होतो. आपण प्रचंड चिडचिड करतो. रागावतो. झालेलं काहीच नसतं. परंतु आपण ‘तसंच घडलंय’ असं ठरवून मोकळे होतो. मग कुणीतरी आपणाला नेमकं काय घडलं ते सांगतं. तेव्हा आपणाला आपलीच चूक उमजते; पण प्रत्येकवेळी असं सांगणारं कुणी भेटेलच असं नाही. तेव्हा अशा घटनांकडे पाहताना आपणाला समजून उमजूनच पाहावं लागेल.

आपण गैरसमज खूप लवकर करून घेतो. मुलांची चूक नसली, तरी त्यांचीच चूक आहे असं सांगत राहतो. अशानं मुलंही तेच शिकून घेतात. समोरच्या व्यक्तीचं वागणं स्वत:च्या सोयीनं ठरवून मोकळी होतात. प्रतिमा उलट क्रमानं दाखवणं हा स्थायीभाव आरशाचा आहे. आपला नव्हे. आपण प्रत्येक वेळा ‘मिरर इमेज’सारखंच समजून वागायला हवं असं नाही.

नात्यांना गरज असते समजून घेण्याची. छोट्या छोट्या घटना अशा नात्यांना हळूहळू कमजोर करत जातात. आपण लावलेला अंदाज, आपला तर्क, आपली चुकीची समज आपल्या नात्यांत दुरावा निर्माण करतात. तेव्हा वेळीच स्वच्छ-स्पष्ट विचार आणि स्पष्ट समजेची भूमिका घेतली पाहिजे. नात्यांसाठी ते पोषक असतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com